ETV Bharat / city

'जनता विचारतेय मोदीजी उत्तर द्या'; भाजप कार्यालयासमोर राष्ट्रवादीने लावले पोस्टर

ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीने वाढत्या इंधनवाढीचा निषेध करण्यासाठी पोस्टर लावले आहे

Posters
भाजप कार्यालयासमोर राष्ट्रवादीने लावले पोस्टर
author img

By

Published : Mar 5, 2021, 3:35 PM IST

Updated : Mar 5, 2021, 3:46 PM IST

ठाणे - ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीने वाढत्या इंधनवाढीचा निषेध करण्यासाठी पोस्टर लावले आहे. ज्यात इंधन महागले प्रवास कसे करणार..अन्नधान्य महागले...काय विकत घेणार? सिलेंडर महागले....अन्न शिजवणार कसे? असा उपरोधी निरोप लिहला आहे. याशिवाय असहय्य होतेय महागाईची मार, पळवून लावू मोदी सरकार असा टोलाही या पोस्टरच्या माध्यमातून केंद्र सरकारला लगावला आहे. त्यामुले आज ठाण्यात या पोस्टरची चर्चा सुरू झाली आहे.

आनंद परांजपे - जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

केंद्रात सत्ता येण्याआधी इंधन दरावरून आंदोलन करणारी भाजप आता आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन मुल्य कमी होऊनही पेट्रोल डिझेलची किंमत कमी करत नाही. अशावेळी सर्व सामान्य माणसाचे हाल होत आहेत. जेव्हा दर जास्त होते तेव्हाचे दर आजही कायम ठेवले आहेत. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोस्टर लावले आहे.

राज्यात आणि केंद्रात वाद

पेट्रोलियम पदार्थांवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये कर लादल्यामुळे किंमती वाढल्या आहेत, अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारही कर कमी करत नाही आणि राज्य सरकारही कर कमी करत नाही. एकमेकांवर खापर फोडून फक्त राजकारण सुरू असल्याचे जाणकार सांगत आहेत. जर दोन्ही सरकारने कर कमी केला तरच सर्वसामान्य माणसाला महागाईमधून दिलासा मिळू शकतो.

हेही वाचा - राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी जे. जे. रुग्णालयात घेतली कोविडवरील लस

हेही वाचा - दिलासा! एक एप्रिलपासून वीज दरात 2 टक्के कपात

Last Updated : Mar 5, 2021, 3:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.