ETV Bharat / city

मुंबई विभागातील पाहिल्या 'हरित रेल्वे स्थानका'ची जीवघेणी दुरावस्था, प्रशासन मात्र गाढ झोपेत; ईटीव्ही भारत'कडून विशेष आढावा - मुंबई विभागातील आसनगाव रेल्वे स्थानक

मुंबई विभागातील पाहिले "हरित स्थानक" रेल्वे स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक नावारुपाला आले आहे. त्यावेळी मोठ्या गाजावाजा करीत रेल्वे प्रशासनाने "हरित स्थानक" म्हणून नामकरण केले होते. मात्र, दीड वर्षांच्या लॉकडाऊन काळात 'हरित स्थानक" समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे पाहवयास मिळाले आहे. या स्थानकात ना सोयी सुविधा, ना होम प्लॅटफॉर्म अशी अवस्था झाली आहे. येथे आजही हजारो प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबतचा ईटीव्ही भारतकडून विषेष आढावा.

आसनगाव रेल्वे स्थानक
आसनगाव रेल्वे स्थानक
author img

By

Published : Aug 6, 2021, 7:32 PM IST

ठाणे - मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील मुंबई विभागातील पाहिले "हरित स्थानक" रेल्वे स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक नावारुपाला आले आहे. त्यावेळी मोठ्या गाजावाजा करीत रेल्वे प्रशासनाने "हरित स्थानक" म्हणून नामकरण केले होते. रेल्वे प्रशासनाकडून (२०२०)पर्यंत रेल्वेच्या एकूण विजेच्या किमान १० टक्के ऊर्जा सौर किंवा हरित उर्जेच्या माध्यमातून तयार करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यातूनच ग्रीन स्थानक ही संकल्पना पुढे आली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पहिले हरित स्थानक बनण्याचा मान कल्याण-कसारा मार्गावरील आसनगाव स्थानकाला मिळाला आहे. मात्र, दीड वर्षांच्या लॉकडाऊन काळात 'हरित स्थानक" समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. या स्थानकात ना सोयी-सुविधा, ना होम प्लॅटफॉर्म. आजही हजारो प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत असल्याचे, येथे दिसून आले आहे. त्याबाबतचा ईटीव्ही भारतकडून विशेष आढावा.

मुंबई विभागातील पाहिले "हरित स्थानक" रेल्वे स्थानक म्हणून आसनगाव रेल्वे स्थानक नावारुपाला आले. मात्र, त्याची दीड वर्षाच्या लॉकडाऊन काळात मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्याबाबतचा ईटीव्ही भारत'कडून विषेष आढावा-

स्थनाकात सौर ऊर्जा व विंड एनर्जी प्रकल्प; तरीही समस्या कायम

मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा लोहमार्गावरील शहापूर तालुक्यातील आसनगाव स्थानक हे पहिले "हरित स्थानक" म्हणून नावारूपाला आले. विशेष म्हणजे या स्थनाकात सौर ऊर्जा व विंड एनर्जी प्रकल्पाच्या 16.2 किलो वॅट विज निर्मिती होते. मात्र, या स्थानकातून परिसरसतील 70 ते 80 गावामधील 75 हजारच्या आसपास रेल्वे प्रवाशी दररोज रेल्वे प्रवास करतात. परंतु, त्यांच्या प्राथमिक सुविधांकडेही रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप, रेल्वे प्रवाशी संघटनानी केला आहे. यात प्रामुख्याने शौचालयाची दुरावस्था झाली असून, स्थानकावर दुसऱ्या शौचालयाची आवश्यकता आहे. मात्र, याकडे रेल्वे प्रशासनाचे पुर्णपणे दुर्लक्ष आहे. यामुळे महिलांची व वृद्धांची मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे. तसेच, होम प्लॅटफॉर्मची मागणीही अनेक वर्षापासूनची असून ती अजूनही पूर्ण झालेली नाही. यामुळे नवीन लोकल ट्रेनची संख्या वाढत नसल्याचे रेल्वे प्रवाशी संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

रखडलेल्या पुलाचे काम सुरू करण्याची मागणी

या मार्गावरील गर्दी टाळलण्यासाठी कल्याण ते कसारा दरम्यान, शटल सेवा सुरू करणे गरजेचे आहे. या स्थानकावरील कसारा बाजूकडील पूल २०१८ मध्ये धोकादायक झाला म्हणून, रेल्वे प्रशासनाने तो पाडला होता. मात्र, या ठिकाणी अद्यापही नवीन पुलाची उभारणी झालेली नाही. यामुळे जीव मुठीत घेऊन रेल्वे प्रवाशी येथून प्रवास करतात. त्यामुळे, पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणीही प्रवाशांनी केली आहे. दरम्यान, तिकीट खिडक्यांची संख्या वाढवणेही महत्वाचे आहे. यामुळे तिकिटासाठी प्रवाशांची लांबचलांब लागणारी रांगा कमी होईल, शिवाय ट्रेन चुकल्याने कामावर लेट मार्क तरी लागणार नाही. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिक व कॉलेज युवक-युवती यांना रेल्वे प्रवासाची मुभा नसल्याने, दंडाची रक्कम खिशात ठेवून त्यांना प्रवास करावा लागतो. यासाठी शासनाने सर्वांसाठी रेल्वे प्रवसाची सुरू करावा अशी मागणीही पुढे आली आहे.

अपंग व वृद्धाना प्रवास करायला अडथळा

या हरित स्थानकावर सौर ऊर्जेवर चालणारे वॉटर कुलर देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडले आहे. तसेच, ज्या ठिकाणी पाणी येत आहे त्या पाण्याच्या टाकीत साधे नळ देखील बदललेला नाही. शिवाय जे ब्रिज बनवले आहेत, त्यांची उंची जास्त असल्याने, अपंग व वृद्धांनाही प्रवास करायला अडथळा निर्माण होत आहे. स्थानकावर काही ठिकाणी लादी उखडली आहे. तसेच, या हरित म्हणवल्या जाणाऱ्या स्थानकावर इतर सोयी सुविधांकडेही रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. परंतु, सध्याची स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून, समस्यांच्या गर्तेत अडकलेल्या आसनगाव स्थानकाला बाहेर काढणे गरजेचे असल्याचे मत, कल्याण-कसारा रेल्वे वेल्फेअर असोशियन पदाधिकारी अनिता झोपे यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.