ठाणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर भाजप नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा विषयी (ST workers strike) टीका करत केलेल्या आरोपांवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत उत्तर दिले असून, एस टी कर्मचाऱ्याची कोणी फसवणूक केली असा प्रश्न विचारत भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजप नेत्याचा पवारांवर आक्षेप
एक भाजप नेत्याने शरद पवार का मध्ये पडतात, त्यांच्या घरी का बैठका होतात असा सवाल उपस्थित केला होता. यावर गेल्या 40 वर्षांपासून एसटी कर्मचार्यांच्या जेव्हा जेव्हा अडचणी निर्माण झाल्या तेव्हा तेव्हा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांनी प्रयत्न केले. ऊसतोड कामगारांचा संप झाला त्यावेळी मुंडे साहेब कामगारांच्या मागण्या घेऊन पवार साहेबांकडे यायचे व पवार साहेब त्यांचे प्रश्नदेखील मिटवायचे तसेच बिडी कामगारांचा संप झाला त्यावेळी देखील नरसय्या आडम व शरद पवार सोबत बसून प्रश्न सोडयचे. परंतु उगाचच काही नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतला आणि त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोललो असे आव्हाड यांचे म्हणने आहे.
फक्त विलीनीकरणावर चर्चा सुरू
काही राजकीय पक्ष एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या जवळपास सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या असून फक्त विलीनीकरणाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. मात्र काही राजकीय नेते एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहेत. असे सांगत आव्हाड यांनी भाजपला टोला मारला आहे.
डोकं शांत ठेवण्यासाठी पानसुपारी खा
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल भिवंडीत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत मुस्लीम बांधवांना डोकं शांत ठेवण्यासाठी पानसुपारी, रजनीगंधा खाण्याचा अजब सल्ला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आव्हाड यांनी मुस्लिम बांधवांना विनंती करताना म्हणले आहे की आपले डोकं शांत ठेवा . जास्त मांस खाऊन डोकं गरम करू नका तुमच्या विरोधकांना हेच हवे आहे. की तुमच डोकं गरम व्हावं परंतु तुम्ही शांत राहा डोक्यावर बर्फ ठेवा.