ठाणे - कोरोना विषाणूचा विळका मुंबई, पुणे या शहरांसह आता ठाण्यातही वाढू लागला आहे. शहरात दररोज किमान दहा वीस तरी करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळेच नागरिकांमध्ये जनजागृती आणि लॉकडाऊनचे नियम कळावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने लाॅंग मार्च काढत ठाणेकरांना पुन्हा एकदा कळकळीचे आवाहन केले आहे.
हेही वाचा... कोरोनाविरुद्ध लढतायेत हे 'मराठी योद्धे', देशभर होतंय कौतुक
'घरात रहा, सुरक्षित रहा'
ध्वनीक्षेपकाच्या सहाय्याने यावेळी नागरिकांना पोलिसांनी संदेश दिला. घरी राहण्याचे आवावहन केले. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा लाॅंग मार्च काढण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी नागरिक सर्रास रस्त्यावर येतात, अशा ठिकाणी गल्ली बोळातून देखील हा मार्च काढण्यात आला. जर नियमांचा भंग केला आणि विनाकारण घराबाहेर पडलात तर थेट जेलची हवा खाली लागेल, लाॅकडाऊनचे नियम आता आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे लोकांनी घरीच रहावे, अशी तंबी यावेळेस पोलिसांनी दिली.