ETV Bharat / city

Fake Money : बनावट नोटाप्रकरणी तीघांना बेड्या; साहित्यासह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त ( Fake notes seized ) केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना बेड्या ठोकल्या ( Three arrested in case of fake notes ) आहे. कल्याण पश्चिम भागात पोलिसांनी धाड टाकून ही कर्यवाही केली.

author img

By

Published : Jul 25, 2022, 5:19 PM IST

Mahatma Phule Police Station
महात्मा फुले पोलीस स्टेशन

ठाणे : कल्याण पश्चिम भागात पोलिसांनी धाड टाकून दोन लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त ( Fake notes seized ) केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीघांना बेड्या ठोकल्या ( Three arrested in case of fake notes ) आहे. मात्र, बनावट नोटांचा वटविणारा मुख्य सुत्रधार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. करण रजक ( रा. पत्रीपूल, कल्याण ), सुरज पुजारी ( रा. पत्रीपूल, कल्याण ), मोहम्मद आरिफ ( रा. उत्तर प्रदेश ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपींना बेड्या - महात्मा फुले पोलीस ठाण्याचे ( Mahatma Phule Police Station ) पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांना बनावट नोटा प्रकरणी खबऱ्यांने माहिती दिली होती. कल्याण पश्चिमेतील अनिल पॅलेस लॉजमधील ( Anil Palace Lodge ) एका खोलीत तिघे जण बनावट नोटा आल्याची गुप्त माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने, निरीक्षक सरोदे विशेष पथकासह सोमवारी पहाटेच्या सुमारास अनिल पॅलेस लॉजमध्ये सापळा रचला होता.

हेही वाचा - Nashik Crime : नाशिक शहरात दुचाकी चोरट्यांना अटक; दहा मोटरसायकली जप्त

खरेदीच्या बहाण्याने वटवायचे बनावट नोटा - पोलीस पथकाने त्यानंतर लॉजमधील एका त्या खोलीत साध्या वेशातील एक पोलीस कर्मचारी जाऊन या तिघांना ‘तुम्ही येथे काय करता’ अशी विचारणा केली. त्यांनी उलट सुलट उत्तरे देऊन लॉजच्या खोलीतून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सापळा लावून बसललेल्या पोलिसांनी खोलीत शिरून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, पोलिसांना त्यांच्या जवळ भारतीय चलनी व्यवहारातील दोन लाख रुपयांच्या दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. बनावट नोटा विविध प्रकारच्या दुकानांमध्ये जाऊन वस्तू खरेदीच्या माध्यमांतून वटविल्या जात होत्या, अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिली.

मुख्य सूत्रधाराचा शोध सुरु - अटक आरोपी पैकी करण हा रिक्षाचालक असून तो कल्याण पूर्वेतील पत्रीपुल परिसरात राहतो. तर, दुसरा आरोपी सुरज हा कल्याण रेल्वे स्थानक भागात हमालाचे काम करतो. तिसरा आरोपी मोहम्मद हा मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील असून तो काही दिवस कल्याण पूर्वेतील पत्रीपूल भागात राहत होता. त्यावेळी आरोपी करण, याची सुरजशी ओळख झाली होती. या तीन अटक आरोपी पैकी मुख्य सूत्रधार दिल्लीचा रहिवाशी असून तोच या बनावट नोटा वितरित करण्याचे काम करतो, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - Accused arrested : आईची हत्या करून फरार झालेला आरोपी अखेर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.