ठाणे - मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्या प्रकरणात चौथ्या दिवशी ठाणे पोलिसांना हत्येशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे लागत आहेत. पोलिसांनी हत्येप्रकरणात शाहिद शेख (३६) या आरोपीला अटक केली आहे. अटक आरोपी शाहिद याला न्यायालयात नेले असता त्याला ३ डिसेंबरपर्यंत आदेश न्यायालयाने दिले आहेत.
राबोडीत पूर्वनियोजितपणे मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख याची हत्या घडविल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तर सीसीटीव्हीने हत्येचे गांभीर्य समोर आले. ठाणे पोलिसांनी कसोशीने तपास करून हत्येत सहभागी असलेल्या आणि अप्रत्यक्षपणे मदत करणारा आरोपी शाहिद शेख याला अटक केली आहे.
हेही वाचा-जमील शेख हत्या प्रकरण : अंत्यसंस्कारात जनसागर, हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट
आरोपीने दिली होती शुटरला दुचाकी-
हत्येत वापरण्यात आलेली दुचाकी ही अटकेतील आरोपीने हत्या करणाऱ्या शूटरला दिली होती. जमील शेख यांची हत्या करण्यासाठी शुटर यांनी वापरलेली दुचाकी ही अटकेतील आरोपीची आहे. न्यायालयात आरोपीला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या अटकेने अद्याप हत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. हत्येबाबत अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे. ठाणे पोलीस हे एका महत्वाच्या आरोपीच्या शोधात आहेत. त्याच्या अटकेने जमील शेख याची हत्या करण्यामागचे कारण स्पष्ट होणार आहे.
![मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/attachedcctvvideosandpics_26112020175612_2611f_1606393572_193.jpg)
हेही वाचा-मनसेच्या वीजबील कपात आंदोलनाला पोलिसांची खीळ; जिल्हाबंदीनंतरही मनसे ठाम
पोलिसांना सापडली हत्येत वापरलेल्या काडतुसाची पुंगळी
राबोडीतील जमील शेख प्रकरणी ठाणे पोलीसाना यश मिळत आहे. सर्वप्रथम हत्येनंतर पोलिसांना हत्येचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरू लागली. संशयितांची आणि सराईतांची चौकशी करण्याची पोलिसांनी मोहीम सुरू केली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देणारा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. तर घटनास्थळी पोलिसांना काडतुसाची पुंगळी सापडलेली आहे. आरोपींनी हत्येसाठी एकाच फैरीचा वापर केला होता.
![घटनास्थळी सापडलेली पुंगळी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/attachedcctvvideosandpics_26112020175612_2611f_1606393572_567.jpg)