मीरा भाईंदर(ठाणे) - भाईंदर पूर्वेकडील नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ मार्चला दुपारी चारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचे दुकान लुटल्याची घटना घडली होती. नवघर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तांत्रिक तपास करून आरोपीला नालासोपारामधून अटक केली आहे.
भाईंदर पूर्वेला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास कामधेनू इमारतीमध्ये रविना गोल्डच्या दुकानात एक अज्ञात व्यक्ती शिरला. त्याने व्यापाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून १७ लाख ४९ रुपयांचा ऐवज लुटून फरार झाला होता. नवघर पोलिसांनी गुन्ह्याचा तपासाला सुरुवात करत सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला. भाईंदर,मिरारोड, वसई,व नालासोपारा येथील सीसीटीव्ही कॅमेरे पडताळणी करत रिक्षा चालकांच्या मदतीने नवघर पोलिसांनी नालासोपारा येथून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबुल केला. आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आपण गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले. नवघर पोलिसांना सोन्याच्या दुकानात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले.
हेही वाचा-मुथुट फायनान्सचे चेअरमन एमजी जॉर्ज यांचे निधन
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई,सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पुल्लि, योगेश काळे,संदीप ओहळ, पोलीस नाईक रवींद्र भालेराव, प्रशांत वाघ, निलेश शिंदे, युनूस गिरगावकर व संदीप जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा-कोरोनाशी लढा: टीव्हीएस कंपनी सर्व कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांना देणार मोफत लस
एक कॅमेरा शहरासाठी-
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी एक कॅमेरा शहरासाठी असे आव्हान केले होते. अनेक इमारती व दुकानदारांनी आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला. अधिक शक्य असल्यास ज्या इमारतीमध्ये किंवा दुकानात कॅमेरा नसेल त्यांनी लावावा. जेणे करून आपली सुरक्षा स्वतःला करता येईल व पोलिसांनादेखील आरोपींना शोध घेण्यास मदत होईल अशी माहिती पत्रकार परिषदेत मीरा भाईंदर वसई विरार पोलीस परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.