ETV Bharat / city

हातोडीचा धाक दाखवून उल्हासनगरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम अटकेत - thane news today in marathi

एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीकांत गायकवाड असे नराधमाचे नाव आहे.

thane physical abuse case
thane physical abuse case
author img

By

Published : Sep 12, 2021, 9:41 AM IST

Updated : Sep 12, 2021, 9:49 AM IST

ठाणे - हातोडीचा धाक दाखवून उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पडक्या घरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ३५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. श्रीकांत गायकवाड असे नराधमाचे नाव आहे.

स्कायवॉकवर दिली हातोड्याने मारण्याची धमकी

पीडित मुलगी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शिर्डीहून कल्याणला एका खासगी बसने आली होती. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकातून लोकलने प्रवास करून तिने उल्हासनगर रेल्वे स्टेशन गाठले. मात्र त्याच रात्री तिला उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवर तिचे दोन मित्र भेटले, त्यांच्याशी बोलत असताना समोरून अचानक आलेल्या नराधम श्रीकांत याने लोखंडी हातोडा दाखवत पीडितेच्या मित्रांना धमकावले. त्यामुळे तिचे दोन्ही मित्र मारहाण होण्याच्या भीतीने पळून गेले. यानंतर नराधमाने पीडितेलाही हातोडीने मारण्याची धमकी देऊन तिला स्टेशनलगत असलेल्या एका पडक्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

रात्रभर पीडित मुलगी घटनस्थळीच

धक्कादायक बाब म्हणजे पहाटेपर्यंत पीडित मुलगी त्या पडक्या घरातच होती. त्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे नराधमाचा शोध घेऊन शनिवारी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.

Last Updated : Sep 12, 2021, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.