ETV Bharat / city

लॉकडाऊनच्या परिस्थितीत आता रुग्णांना मिळणार मोफत केसपेपर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्वच आरोग्य केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे केसपेपर काढण्यासाठी रांगा लावाणे आणि त्यासाठी १० रुपये मोजावे लागत होते. मात्र, आता रुग्णांना त्यासाठी पैसे मोजावे लागणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.

Thane Mayor Naresh Mhaske
ठाणे महापौर नरेश म्हस्के
author img

By

Published : Apr 4, 2020, 6:09 PM IST

ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे साध्या आजारांवरदेखील उपचार घेण्यासाठी नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. यासाठी महापालिकेने प्रभाग समिती निहाय खासगी डॉक्टरांच्या सहाय्याने बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. यासाठी येथे रुग्णांकडून 10 रुपये इतकी केसपेपर फी आकारण्यात येत होती. रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत व गर्दी टाळावी, यासाठी आता लॉकडाऊन असेपर्यंत रुग्णांकडून केसपेपरसाठीचे 10 रुपये आकारण्यात येणार नाही, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

हेही वाचा... हैदराबादचे हे डॉक्टर कुटुंब देत आहे कोरोनाशी लढा

लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना साध्या आजारांवरदेखील उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेच्या विविध भागात आरोग्यकेंद्र सुरू करण्यात आले आहेत. महापालिका आरोग्यकेंद्रातील सर्व डॉक्टर्स हे कोरोनाचा प्रतिबंध करण्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे खासगी डॉक्टरांच्या मदतीने ओपीडी आरोग्यकेंद्रात रुग्णांना सेवा दिली जात आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला असून तेदेखील रुग्णांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी मदत करत आहेत. या आरोयकेंद्रात येणाऱ्या रुग्णांकडून 10 रुपये केसपेपर फी आकारण्यात येत आहे. त्यामुळे येथे गर्दी होत होती. यावर पर्याय म्हणून सद्यस्थितीत रुग्णांकडून केसपेपरची फी आकारण्यात येवू नये, अशी मागणी वजा निर्देश म्हस्के यांनी आयुक्तांना पत्रान्वये दिले होते.

महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनीदेखील तत्काळ ही मागणी मान्य करुन आरोगयकेंद्रांना सूचना देऊन लॉकडाऊन असेपर्यंत केसपेपरची फी न आकारण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत महापौरांनी आयुक्त विजय सिंघल यांच्यासह कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी काम करत असलेल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी, डॉक्टर्स, नर्सेस यांच्या कामाची दखल घेवून त्यांचे कौतुक केले आहे. सद्यस्थितीत सर्वजण कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा.... केरळच्या प्राध्यापकाने बनवले कमी खर्चातले 'पोर्टेबल व्हेंटिलेटर'

महापालिकेच्या आरोग्य विभागाला स्वेच्छेने मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे रुग्णांना चांगली सेवा मिळावी, व सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे रुग्णांना निश्चीतच दिलासा मिळेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच याकामी पुढाकार घेवून सहकार्य करणाऱ्या खासगी डॉक्टर्स व सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्ते करत असलेल्या कामाचे महापौरांनी कौतुक केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.