ETV Bharat / city

Ulhasnagar Crime: उल्हासनगरातील पप्पू कालानीच्या भावाला हैद्राबादच्या भामट्याने लावला 40 लाखांचा चुना

Ulhasnagar Crime: उल्हासनगर शहरातील माजी आमदार पप्पू कालानी Former MLA Pappu Kalani यांच्या भावाला हैद्राबादच्या एका भामट्याने 40 लाखांचा चुना लावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चुना लावणाऱ्या भामट्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात Central Police Station आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. क्रीष्णाकांत फुलपाथरी (रा. श्रीपूरम कॉलनी, हैद्राबाद ) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.

Ulhasnagar Crime
Ulhasnagar Crime
author img

By

Published : Sep 30, 2022, 10:59 PM IST

ठाणे: उल्हासनगर शहरातील माजी आमदार पप्पू कालानी Former MLA Pappu Kalani यांच्या भावाला हैद्राबादच्या एका भामट्याने 40 लाखांचा चुना लावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चुना लावणाऱ्या भामट्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात Central Police Station आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. क्रीष्णाकांत फुलपाथरी (रा. श्रीपूरम कॉलनी, हैद्राबाद ) असे गुन्हा दाखल झालेल्या भामट्याचे नाव आहे.

असा घडला प्रकार माजी आमदार पप्पू कालानी यांचे बंधू नारायण बुधममल कालानी (वय ७९) यांचे उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर तीन भागातील फर्निचर बाजारमध्ये प्रसिद्ध हॉटेल आहे. तर आरोपी क्रीष्णाकांत हा हॉटेल मालक नारायण कालानी यांच्या बँकेचे आर्थिक व्यवहार गेल्या अनेक वर्षापासून विश्वासाने सांभाळत होता. त्यातच हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी To pay GST आरोपी क्रीष्णाकांत याला हॉटेल मालक नारायण यांनी उल्हासनगर मधील 2 बँकेत खात्यामधून ४० लाख ९७ हजार ३७५ हजराचे दोन धनादेश ३ ऑक्टोंबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ या दरम्यान देऊन हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा करण्यासाठी दिले.

मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव मात्र आरोपीने नोकराने हॉटेलचा टॅक्स व जीएसटीचा भरणा न करता सदरचे धनादेश आपल्या व मित्राच्या खात्यात वळते करून मालकांची आर्थिक फसवणूक केली. दुसरीकडे नोकरानेच विश्वासघात करून आपली फसवणूक केल्याचे समजताच हॉटेल मालक नारायण यांनी २९ सप्टेंबर रोजी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव Central Police Station घेऊन हैद्राबादला राहणाऱ्या क्रीष्णाकांत फुलपाथरी यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे ४० वर्ष कालानी परिवाराचे शहरात राजकीय व अनेक व्यवसायात वर्चस्व आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्यांची आर्थिक फसवणूक झाल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.