ठाणे : सण आणि उत्सव साजरे करणे हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य असा भाग आहे. स्त्री-जीवनात श्रावण महिन्यातील महत्त्वाचा असलेला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सण येतो. महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणांमधे नागाच्या पूजेला महत्त्वाचे स्थान आहे. नागपूजा ही भारतातील जवळजवळ सर्वच प्रांतात पहावयास मिळते. महाराष्ट्रातील स्त्रिया नागपंचमीचा सण( Nagpanchami festival ) मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. राज्यात नागपंचमी सण मोठ्या उत्सवात साजरा होत असतानाच दोन हायप्रोफाईल सोसायटयांच्या आवारात भल्यामोठ्या नागांचे दर्शन नागपंचमीच्या दिवशी झाले. मात्र नागाला पाहताच रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. सर्पमित्राने या दोन्ही भल्यामोठ्या नागाला शिताफीने पकडून पिशिवीत बंद केल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला.
सोसायटीच्या स्टोअर रूममध्ये दळून बसला नाग - पहिल्या घटनेत कल्याण पश्चिम भागातील गोदरेज हिल या हायप्रोफाईल सोसायटीच्या आवारात नागपंचीमच्या दिवशी भलामोठा नाग शिरताना एका रहिवाशाने पहिले. त्यानेच सोसायटीत नाग शिरल्याची माहिती देताच रहिवाशांनी नागाला पाहण्यासाठी एकच गर्दी केल्याने नाग घाबरून सोसायटीच्या स्टोअर रूममध्ये घुसुन बसला होता. त्यातच चव्हाण नावाच्या रहिवाशाने सर्पमित्र हितेश करंजगावकर याला संर्पक करून नाग सोसायटीत शिरल्याची माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र ( snake friend ) हितेशने घटनास्थळी धाव घेऊन नागाला शिताफीने पकडले. हा नाग इंडियन कोब्रा ( Indian cobra ) जातीचा असून साडेपाच फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्राने दिली.
क्लिनिकच्या दारात फणा काडून बसला नाग - दुसऱ्या घटनेतही नागपंचमीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास भिवंडी शहरातील अशोकनगर मधील एका हायप्रोफाईल सोसायटीमध्ये असलेल्या क्लिनिकच्या दारात फणा काडून बसलेला नाग कंपाऊंडर तरुणीला दिसला. नागाला पाहताच तिने आरडाओरडा केल्याने नाग घाबरून सोसायटीच्या मागच्या बाजूने अडगळीत ठिकाणी दळून बसला. दुसरीकडे नाग सोसायटीत शिरल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरल्याने नागरिकांनी नागाला पाहण्यासाठी गर्दी केली. त्यातच सोसायटीत नाग शिरल्याची माहिती कंपाऊंडर तरुणीने सर्पमित्र हितेशला दिली.
कोब्रा नागांना निर्सग मुक्त करून सर्पमित्राने दिले जीवदान - माहिती मिळताच सर्पमित्र हितेश घटनास्थळी पोहचून याही नागाला शिताफीने पकडले. हा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून पाच फूट लांबीचा असल्याची माहिती सर्पमित्राने दिली. दरम्यान वन अधिकाऱ्यांची परवानगीने नागपंचीमच्या दिवशीच सायंकाळच्या सुमारास दोन्ही कोब्रा नागांना निर्सग मुक्त करून सर्पमित्राने त्यांना जीवदान दिले.
हेही वाचा :Rakshabandhan: रक्षाबंधनाच्या दिवशी राशींवर होणारा प्रभाव