ETV Bharat / city

ठाणे जिल्ह्यात एका मतामुळे शिवसेनेच्या सरपंच पदाचे स्वप्न धुळीला... - thane breaking news

एका मतामुळे कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत टीम ओमी कालानी या पक्षाने महत्वाची भूमिका बजावली.

सरपंच
सरपंच
author img

By

Published : Feb 10, 2021, 6:52 PM IST

ठाणे - जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ग्रापंचायत निवडणुकीत वेगळंच राजकीय वातावरण पाहवयास मिळाले. शिवसेनेसह भाजपनेही बहुतांश ग्रामपंचायती ताब्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र अवघ्या एका मतामुळे कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत टीम ओमी कालानी या पक्षाने महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सेनेच्या गटाचा दारुण पराभव झाला असून शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे.

ओमी कालानी
सरपंच पदाची निवडणूक शिवसेनेने केली होती प्रतिष्ठेची-

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील कांबा ग्रामपंचायतीत सरपंच पदी भारती भगत आणि उपसरपंच पदी संदीप पावशे यांचा विजय झाला आहे. १३ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत गांवदेवी पॅनलला ७ तर शिवसेनेच्या गटाला ६ मत पडली. त्यामुळे एक मताने पराभव झाल्याने सेनेच्या तो जिव्हारी लागला आहे. ही निवडणूक शिवसेना आणि टीम ओमी कालानी पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. अखेर एका मतासाठी सेनेला पराभव पत्करावा लागला आहे. आता याठिकाणी सरपंच आणि उपसरपंच टीम ओमी कालानी पक्षाचा बसला आहे.

कांबा ग्रामपंचायत टीम ओमी कालानीच्या ताब्यात येताच कार्यकर्त्यांनी गुलाल उडवत जल्लोष केला. याप्रसंगी टीम ओमी कालानीचे प्रमुख ओमी कालानी, युटीए अध्यक्ष सुमित चक्रवर्ती प्रवक्ता कमलेश निकम, कार्याध्यक्ष संतोष पांडे, अमित वाधवा, आकाश चक्रवर्ती, सुंदर मुदलियार, नरेश साळवे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा- रश्मी ठाकरे यांच्या नावे असलेल्या कोर्लई जमिनीची चौकशी करा - सोमैया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.