ठाणे - भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील जे. ई. मेकॅनिकल कंपनीत बुधवारी नायट्रोजन गॅसचा स्फोट झाला. या दुर्घटनेत ठाणे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या अल्पेश भोईर या कामगाराचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांची संख्या आता तीन वर पोहचला आहे. तर जखमी तीन जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत.
शासकीय परवानगी न घेता कंपन्या आणि उद्योग व्यसायास सुरू-
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात असंख्य गोदम आहेत. याठीकाणी अनधिकृत व्यवसाय उद्योग कोणत्याही शासकीय परवानगी शिवाय सुरू आहेत. या उद्योगांची नोंद कोणत्याही शासकीय यंत्रणेकडे नसल्याने अशा दुर्घटना झाल्या नंतर फक्त चर्चा होते. मात्र कारवाई होत नाही. निष्पाप कामगार युवकांच्या मृत्यूस कंपनीत कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही. त्यामुळे कंपनी व्यवस्थापक याला जबाबदार असून जे ई मेकॅनिकल कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. व मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक निलेश चौधरी यांनी तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
प्रमाणा पेक्षा जादा नायट्रोजन गॅस सिलेंडरचा साठा-
या कंपनीत स्टील कटिंग करण्याचे काम करीत असताना प्रमाणापेक्षा जास्त नायट्रोजन गॅस सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅस साठा करण्याचा परवाना कंपनीकडे होता का ? कंपनी व्यवस्थापनाने कोणत्याही सुरक्षा उपाय योजनांची व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे या कामगारांच्या जीवाशी कंपनी मालक खेळत असून त्यातूनच तीन निष्पाप कामगारांचा जीव गेल्याने कंपनी मालक विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी निलेश चौधरी यांनी पोलीस उपायुक्त यांना दिलेल्या पत्रात केली आहे.
पोलिसांची तपासात चालढकल-
याबाबत नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांना विचारले असता. सध्यातरी अपघात घटनेची नोंद करण्यात आली असून , कंपनी निरीक्षक व इतर तांत्रिक बाबींचा तपास करून या दुर्घटनेस कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होणार असल्याने त्यानंतर योग्य तो गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती दिली.
बुधावरी झाला होता दोन कामगारांचा मृत्यू-
प्रवीण भोईर (वय 24), अक्षय अशोक गौतम (वय 21) या दोघांचा यात मृत्यू बुधवारी झाला होता. तर मुनीर मोहम्मद हुसेन मोमीन, विवेकानंदा, बजरंग शुक्ला आणि अल्पेश भोईर हे गंभीर जखमी झाले होते. मात्र आज गंभीर जखमी पैकी अल्पेश भोईर याचा ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारे - गृहमंत्री
हेही वाचा-नागपुरात आजी आणि नातवाचा राहत्या घरी खून; प्रेम प्रकरणातून हत्याकांड घडल्याचा पोलिसांना संशय