नवी मुंबई: लॉकडाऊन मुळे सर्वत्र खानावळी बंद आहेत. याचा सर्वांत जास्त फटका पोलिसांना बसत आहे. पोलिसांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून अशा वेळी नवी मुंबई पोलिसांनी बॅचलर पोलिसांच्या जेवणाची सोय केली आहे.
विरुद्धच्या लढ्यात डॉक्टरांसोबतच आपले पोलिस प्रशासनदेखील दिवस रात्र मेहनत घेत आहेत. या पोलिस प्रशासनातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता पोलिस प्रशासनानेच पुढाकार घेतला आहे. लॉकडाऊन मुळे सर्व हॉटेल व खानावळी बंद आहेत. अशावेळी नवी मुंबई पोलिसांनी आपल्या बॅचलर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. या सोबतच अनेक पोलिस कर्मचारी कामात व्यस्त असल्याने रोज लागणारे किराणा सामानदेखील घेण्यास त्यांना वेळ भेटत नाही. अशावेळी सर्व कर्मचाऱ्यांना निदान 15 ते 20 दिवसांचे किराणाचे सामान नवी मुंबई पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे. नवी मुंबईतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना ही मदत देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केली.