ETV Bharat / city

नवी मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना लसीकरणाची तयारी; असा आहे प्लॅन - नवी मुंबईत कोरोना लसीकरणाची तयारी न्यूज

नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी संबंधित 16 हजाराहून अधिक कोरोना योद्धयांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे.

new mumbai municipal corporation's Covid-19 vaccination plan for new Mumbai.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून कोरोना लसीकरणाची तयारी; असा आहे प्लॅन
author img

By

Published : Dec 20, 2020, 1:41 AM IST

नवी मुंबई - केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे. यात पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी या कोरोना योध्दयांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

पालिका व खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील 12 हजार 431 कर्मचाऱ्यांची नोंद
कोरोना लसीकरण अंतर्गत पहिल्या टप्प्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या 42 केंद्रांमधील 4 हजार 490 कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत 904 संस्थांतील 12 हजार 431 कर्मचारी यांची संगणकीकृत नोंद महानगरपालिकेकडे करण्यात आली आहे.

लसीकरणाची पूर्व तयारी
लसीकरणाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी सक्षम पूर्वतयारी करीत हे नियोजन करण्यात आलेले आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर नोंदणी झालेल्या व्यक्तीस लसीकरणाचा दिवस व स्थळाबाबत त्याने नोंदणी केलेल्या मोबाईलवर मॅजेस येणार आहे. लसीकरण झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही मोबाईलवर प्राप्त होणार आहे.

एका केंद्रावर 100 व्यक्तींना लस देणार
कोरोना लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार आहे. तसेच प्रत्येक पथकामध्ये 4 व्ह‌ॅक्सीनेशन ऑफिसर व 1 व्हॅक्सीनेटर ऑफिसर यांचा समावेश असणार आहे. एका केंद्रावर दररोज 100 व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.

लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आले घेण्यात
या लसीकरण मोहिमेसाठी राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिका स्तरावरही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 17 डिसेंबर रोजी झालेले आहे. याशिवाय 22 डिसेंबरला कर्मचा-यांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.

लसीकरण झाल्यानंतरही वारंवार हात धुणे अथवा सॅनिटायझरचा वापर करणे तसेच मास्क घालणे व सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक आहे. या बैठकीत सर्व संस्थांनी आवश्यकतेनुसार अपेक्षित मनुष्यबळ तसेच लसीकरणासाठी जागा अशा पूरक बाबी उपलब्ध करुन द्याव्यात, असे आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत सूचित करण्यात आले आहे. कोरोनाच्या लसीला केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर करावयाच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे.

हेही वाचा - धक्कादायक ! ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या विधवेची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या

हेही वाचा - डोंबिवली रेल्वे स्थानकातील आरपीएफ जवानाला मारहाण; हल्लेखोर गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.