ETV Bharat / city

पारसिकनगरमधील नवरात्रौत्सव यंदा होणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय

यंदा कोरोनामुळे सर्वच सण साजरे करण्यावर मर्यादा येत असल्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा खारीगाव-पारसिक नगर येथील नवरात्रौत्सव या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Jitendra Awhad
गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Sep 23, 2020, 5:06 PM IST

ठाणे - मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा खारीगाव-पारसिक नगर येथील नवरात्रौत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरवर्षी संघर्ष या संस्थेच्या वतीने पारसिकनगरमध्ये मोठ्या उत्साहात नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे सर्वच सण साजरे करण्यावर मर्यादा येत असल्याने डॉ. आव्हाड यांनी हा निर्णय घेतला आहे.

गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड माहिती देताना

या संदर्भात आव्हाड यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांमध्ये सर्वांना नवरात्रीचे वेध लागतील. आपण मतदारसंघात गेली 10 वर्षे नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतो. दांडिया-गरबाही खेळला जातो. मात्र, यंदा तेथील नागरिकांनीच गरब्याचे आयोजन करू नका, अशी विनंती केली आहे. तसेच, देवीची प्रतिष्ठापनाही कोणाच्या तरी घरी करण्यात यावी, असेही नागरिकांनी सुचविले आहे. या सुजाण नागरिकांच्या विनंतीचा मान ठेऊन यावेळी सार्वजनिक नवरात्रौत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यभर वाढणारी रुग्णसंख्या पाहता सर्वांनी सावधगिरी पाळली पााहिजे. नवरात्रौत्सवात एकत्र भेटणे, दर्शनाला एकत्र येणे यामुळे पुढील दिवाळी धोक्यात येऊ शकते. एकंदरीत वाढती रुग्णसंख्या जरा चिंताजनक आहे. मृत्यूदर घटला असला तरी रुग्णसंख्या कमी होत नाही. त्यामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतात त्यांनी या सर्व बाबींचा विचार करावा, असेही डॉ. आव्हाड यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.