ETV Bharat / city

कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन

author img

By

Published : Dec 18, 2019, 11:47 AM IST

कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दोन अभियंते व एक एसआय (स्वच्छता निरीक्षक) यांचे निलंबन केले आहे. मनोहर सोनवणे, सुजित पारवे, अरुण पाटील असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

navi mumbai
नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई - कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दोन अभियंते व एक एसआय(स्वच्छता निरीक्षक) यांचे निलंबन केले आहे. मनोहर सोनवणे, सुजित पारवे, अरुण पाटील असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून संबंधित कारवाईने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच यापुढेही कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर अशाच प्रकारे कडक कारवाई केली जाईल, असे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितले.

हेही वाचा - अनुदानाच्या मागणीसाठी शिक्षकांचा जोगेश्वरीत मूकमोर्चा

केंद्र सरकारने गृहनिर्माण व नागरी विभागामार्फत स्वच्छ भारत अभियान संबंधी हैदराबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कार्यकारी अभियंता मनोहर आनंदा सोनवणे यांचे नाम निर्देशन केले होते, तशी कल्पनाही सोनवणे यांना देण्यात आली होती. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून या कार्यशाळेत हे अधिकारी सहभागी न होता गैरहजर राहिले. त्यामुळे गैरवर्तन व कर्तव्यात कसूर दाखवल्याने त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे. यावर पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई राहणार आहे.

हेही वाचा - डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली 'ही' ठरली शेवटची नाटकं, कलाकारांना दिली होती कौतुकाची थाप

कनिष्ठ अभियंता सुजित पारवे यांनी नेरूळ एल पी नाका येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाबाबत योग्यरित्या देखरेख न केल्याने शौचालयाचे गलिच्छ पाणी रस्त्यावर येत होते. हे आयुक्तांनी शहरातील सार्वजनिक शौचालय पाहणी दौऱ्यात निष्पन्न झाले. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाची देखरेखीची जबाबदारी अभियंत्यांवर असून त्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली.

स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जी केल्याप्रकरणी अरुण पाटील (स्वच्छता निरीक्षक ) यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पुढे जर कोणी अशा प्रकारे कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर अशीच कारवाई केली जाईल, असे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले आहे.

Intro:कामात निष्काळजीपणाचा ठपका ठेवत नवी मुंबई महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचे निलंबन...

नवी मुंबई:
कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दोन अभियंते व एक एस आय(स्वच्छता निरीक्षक)यांचे निलंबन केले आहे.मनोहर सोनवणे,सुजित पारवे,अरुण पाटील असे निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची नावे असून संबंधित कारवाईने पालिका वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तसेच यापुढेही कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर अशाच प्रकारे कडक कारवाई केली जाईल असे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितले.
केंद्र शासनाने गृहनिर्माण व नागरी विभागामध्ये मार्फत स्वच्छ भारत अभियाना संबंधी हैदराबाद येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कार्यकारी अभियंता मनोहर आनंदा सोनवणे यांचे नाम निर्देशन केले होते तशी कल्पनाही सोनवणे यांना देण्यात आली होती मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लंघन करून या कार्यशाळेत हे अधिकारी सहभागी न होता गैरहजर राहिले. त्यामुळे गैरवर्तन व कर्तव्यात कसूर दाखवल्याने त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली आहे यावर पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई राहणार आहे. तर कनिष्ठ अभियंता सुजित पारवे यांनी नेरूळ एल पी नाका येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामा बाबत योग्य रित्या देखरेख न केल्याने शौचालयाचे गलिच्छ पाणी रस्त्यावर येत होते हे आयुक्तांनी शहरातील सार्वजनिक शौचालय पाहणी दौऱ्यात निष्पन्न झाले त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाची देखरेखीची जबाबदारी अभियंत्यांवर असून त्यांनी त्यांच्या कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली.तर स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जी केल्या प्रकरणी अरुण पाटील एस आई (स्वच्छता निरीक्षक ) यांचे निलंबन करण्यात आले .त्यामुळे एकाच दिवशी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या पुढे जर कोणी अशा प्रकारे कामात हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर अशीच कारवाई केली जाईल असे नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगीतले आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.