ठाणे - ठाण्यात मुसळधार पावसात पाणी तुंबण्याच्या असंख्य घटना घडतात. दरम्यान पाणी तुंबण्यामागे नाले सफाई, मुख्य प्रवाहाच्या नाल्याचे प्रवाह बदलण्यात आल्याने नाल्यातून पाण्याचा निचरा होत नाही. तर नाल्यात गाळ अडकल्याने पाण्याचा निचरा होत नाही. यासाठीच पावसाळ्यापूर्वी नालेसफाइवर भर देण्यात येतो. मात्र भर पावसात नालेसफाइची पाहणी करणाऱ्या पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी नाले तुंबण्याचे प्रकार हे प्लास्टिक कचऱ्यामुळे झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा मनपाच्या कामावर नागरिक प्रश्नचिन्हे उपस्थित करत आहे.
तरुणाचा झाला होता मृत्यू
ठाण्यात वंदना सिनेमा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मुसळधार पावसात पाणी साचण्याचे प्रकार घडतात. ठाण्यात बहुतांश ठिकाणी साचणारे पाणी हे नाल्याच्या रचनेत बदल केल्याने त्याचे परिणाम समोर येत आहेत. ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तांनी दौरा करून पाणी भरणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली आहे. दौऱ्यानंतर पालिका प्रशासनाने यामधील कचरा आणि मुख्यत्वे प्लास्टिकच्या पिशव्या असल्याचे सांगितले आहे. शिवाय पाणी साचण्याचे प्रकार रोखण्यासाठी प्लास्टिक विरोधात मोहीम सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. कोरोम मॉलच्या परिसरात सर्व्हिस रोडवर ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात दिव्यातील ३५ वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे एका तरुणाचा जीव गेला असा आरोपही झाला. अशा ठेकेदारावर पालिकेकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पालिकेच्या मलनिस्सारण विभागातील कनिष्ठ अभियंता विजय लोकरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा -संजय राऊतांनी तोंडाची वाफ दवडू नये - चंद्रकांत पाटील