ETV Bharat / city

धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची हत्या; आरोपी गजाआड

author img

By

Published : Jul 17, 2021, 4:49 PM IST

चिमुरड्याची हत्या करणारा आरोपी जितेंद्र याला भोईवाडा पोलिसांनी अवघ्या अठरा तासात अटक करून भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यास २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. तर या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

चिमुरड्याची हत्या
चिमुरड्याची हत्या

ठाणे - खानावळीसाठी घरी येणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचे आठ वर्षाच्या मुलाच्या आईशी अनैतिक संबंध होते. मात्र अनैतिक संबंधामध्ये ८ वर्षीय चिमुरडा अडसर ठरत असल्याने त्या चिमुरड्याचे आरोपीने अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील कारवली गावातील एका इमारतीच्या बंद खोलीत घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. जितेंद्र मधेशिया (वय २१) असे अटक आरोपीचे नाव आहे.

चिमुरड्याच्या अपहरणाची तक्रार केली होती दाखल -

भिवंडी तालुक्यातील कारिवली गावच्या हद्दीतील एका इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबाचा ८ वर्षाचा मुलगा हा गुरुवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने परिसरात शोधूनही त्याचा शोध न लागल्याने अखेर भोईवाडा पोलीस ठाण्यात त्याच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला असता शुक्रवारी पहाटेच्या सुमारास आठ वर्षीय चिमुरड्याचा गळा आवळून खून केल्याच्या अवस्थेत मृतदेह तो राहत असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एक बंद खोलीत आढळून आला. भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

अनैतिक संबधाचे बिंग फुटल्याने चिमुरड्याची हत्या -

पोलिसांनी तपास सुरु केला असता त्या परिसरातील संशयित म्हणून आरोपी जितेंद्र याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबुल केले. आरोपी जितेंद्र हा हत्या केलेल्या कुटुंबाकडे खानावळ लावून जेवण करण्यासाठी येत होता. त्यावेळी तो हत्या झालेल्या मुलाच्या आईसोबत शारिरीक लगट करीत असल्याबाबत मुलाने आपल्या वडिलांना ही गोष्ट सांगितल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन त्याची खानावळ बंद केली. मुलाने आपले कारस्थान सांगितल्याने आपले बिंग फुटले, याचा राग मनात ठेवून जितेंद्र याने आठ वर्षीय चिमुरड्यास खेळायच्या बहाण्याने बोलवून आपल्यासोबत चौथ्या मजल्यावर एक बंद खोलीत घेऊन गेला व त्याठिकाणी त्याची गळा आवळून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक एस एन चव्हाण यांनी सांगितले आहे .

आरोपीला अठरा तासातच अटक -

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.