ठाणे - मुंबई - नाशिक महामार्गावर ( Mumbai-Nashik highway ) शहापूर तालुक्यातील गोलभण गावा जवळ महामार्गालगत एका स्कार्पिओ कारमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात हत्येसह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी पोलिसांच्या गस्ती पथकाला शहापूर तालुक्यातील गोलभण गावा जवळ असलेल्या मुंबई – नाशिक महामार्गावरील रस्त्याच्या कडेला पार्क केलेली स्कॉर्पिओ कार दिसली. संशयावरून कारची तपासणी केली असता पोलीस पथकाला सुमारे 35 - 40 वयोगटातील एका तरुणाचा मृतदेह डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनास्थळी पंचनामा - त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. MH-06 AN, 1436 नंबर च्यास्कॉर्पिओ कारमध्ये मृतदेह टाकून ही कार अज्ञात आरोपींनी मुंबई - नाशिक महामार्गच्या बाजूला एका झाडा खाली उभी करून कार सोडून पसार झाले आहेत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसापासून ही स्कॉर्पिओ कार मुंबई नाशिक महामार्गा लगत उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांकडून कारची तपासली असता स्कार्पिओ कारमध्ये प्रफुल पवार याचे नावाने चेक बुक आढळून आले आहेत. या तरुणाचा इतरत्र खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. रावा नष्ट करण्यासाठी मृतदेह महामार्गावर आणून टाकला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 302 खून ( Muder ) 201 पुरावा नष्ट करणे ( Destroying evidence) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेहाचा ओळख पटविण्यासाठी पुढील तपास शहापूर पोलीस तसेच ठाणे ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभाग करत आहेत.
हेही वाचा - Umesh Kolhe Murder : लुटमाराची घटना नाही; उमेश कोल्हे यांच्या हत्येमागचे कारण आले समोेर