ETV Bharat / city

Mumbai Local Fatka Gang : फटका गँगच्या गुन्हेगाराला फिल्मी स्टाईलने पाठलाग करत रेल्वे पोलसांनी केले जेरबंद - मुंबई लोकल ट्रेन फटका गॅंग

लोकल, मेल, एक्सप्रेस ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या ( Fatka Gang In Mumbai Local ) प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स , बॅग पळविणाऱ्या फटका गँगच्या सराईत गुन्हेगाराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ( Fatka Gang Member Arrest By Thane Police ) फिल्मी स्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले आहे.

Mumbai Local Fatka Gang
Mumbai Local Fatka Gang
author img

By

Published : Mar 23, 2022, 5:27 PM IST

Updated : Mar 23, 2022, 6:27 PM IST

ठाणे - लोकल, मेल, एक्सप्रेस ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या ( Fatka Gang In Mumbai Local ) प्रवाशांच्या हातावर फटका मारुन मोबाईल, पर्स , बॅग पळविणाऱ्या फटका गँगच्या सराईत गुन्हेगाराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी ( Fatka Gang Arrest By Thane Police ) फिल्मी स्टाईलने पाठलाग करत जेरबंद केले आहे. अजय अर्जुन कांबळे, (२४) रा. होमबाबा टेकडी, पत्रीपुल, कल्याण, असे जेरबंद केलेल्या फटका गँगच्या गुन्हेगारच नाव आहे.

प्रतिक्रिया

प्रवाशांच्या हातावर मारायचा फटका : मध्य रेल्वेच्या मार्गावर धावणाऱ्या लोकल, मेल ट्रेनमधून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हातावर फटका मारुन मोबाईल व इतर वस्तू पळविणाऱ्या विरोधात कारवाईची मोहीम १६ मार्च पासून राबविण्यात येत आहे. यासाठी विविध फटका गँगच्या पाईंटवर कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाल्मीक शार्दुल यांनी गुन्हे तपास पथकाची नेमणूक केली. या पथकात पोलीस उपनिरक्षक पवार, पोहवा, कुटे, पोना जगताप, विशे, चव्हाण, शेळके, केदार व व्हरकट यांना सुचना व मार्गदर्शन करुन पथक तयार करुन या पोलीस पथकांना फटका गँग पॉईटंच्या ठिकाणी सापळा लावण्याचे आदेश दिले. त्याअनुषगाने २१ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास डाऊन बदलापूर लोकलच्या मोटरमन बाजूकडील प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यात डाव्या बाजुच्या दरवाज्यात उभे राहून एक महिला प्रवास करीत होती. त्यावेळी लोकल कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन दरम्यान स्लो धावत असताना पोल नं.५३/२०२० वर फटका गँगचा आरोपी अजय चढून पूर्व तयारी करुन बसला होता.

पोलिसांच्या हाताला घेतला जोरदार चावा : लोकल त्या रेल्वे पोल जळून जात असतानाच त्याने महिलेच्या हातावर जोरदार फटका मारून महागडा मोबाईल खाली पाडून तो मोबाईल घेऊन पळून जात असताना गस्तीवरील पोलीस शिफाई केदार यांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पोलीस शिफाई केदार यांच्या हाताला जोरदार चावा घेवून दुखापत केली. मात्र, तरीही पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून मोबाईलसह रंगेहाथ पकडले. या आरोपी विरोधात भादंवि. कलम ३९२,३८२,३३२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तर आज (बुधवारी ) कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Hero MotoCorp Shares Dip : हिरो मोटोकॉर्पचे शेअर्स 4 टक्क्यांनी घसरले - IT रिपोर्ट

Last Updated : Mar 23, 2022, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.