ठाणे : ठाण्यातील कोलबड परिसरात रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या एका भाजीविक्रेत्यास महिला मनसे पदाधिकाऱ्याने भर रस्त्यात मारहाण ( MNS office bearer beats vegetable seller ) केली. मी तुला धंदा लावायला दिला. माझ्याशी गद्दारी करतो, असे म्हणत या महिला मनसे पदाधिकाऱ्याने ( Thane MNS Office Bearer ) मनसे शाखेसमोर भाजी विक्रेत्याला मारहाण केली आहे. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही तर तिने लाथा- बुक्क्या मारून भाजी विक्रेत्याच्या भाज्या रस्त्यावर टाकत त्याचे आर्थिक नुकसानदेखील केले आहे.
मनसे शाखाध्यक्षाने उघडकीस आणला प्रकार : मनसेच्या ठाण्यातील सभेच्या दिवशी कोलबाड भागात मनसेची गुंडागर्दी पाहायला मिळाली. रस्त्यावर भाजी विक्री करण्याची पालिकेची पावती घेऊनही दिवसाचा हफ्ता 50 रुपये का दिला नाही? म्हणून भाजी विक्रेत्याला मारहाण करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे ही मारहाण शाखा अध्यक्ष पीटर डिसोझा यांनी रेकॉर्ड केली असून, त्यांच्या कार्यालयाच्याबाहेर हा प्रकार घडला आहे. या प्रकारानंतर आज या बातमीचा आढावा घेतला असता, तो भाजी विक्रेता त्याच ठिकाणी भाजी विक्री करताना दिसला. मात्र माध्यमाचे कॅमेरे पाहून तो पळून गेला.
पोलीस तक्रार नाही : या संदर्भात कोणतीही पोलीस तक्रार झाली नसून, भाजीविक्रेता नाराज झाला आहे. पण पोट भरण्यासाठी मारही खावा लागतो, असे सांगत आहे. एकीकडे न्यायाची भाषा करणाऱ्या या पक्षाने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
हेही वाचा : मदरशात छापे मारा पाहा काय मिळते?; मनसे प्रदेश सचिवांचा सवाल