ठाणे - गुढीपाडव्याच्या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर झालेल्या विविध राजकीय पक्षाच्या टिकेला उत्तर देण्यासाठी उद्या ठाण्यात उत्तर सभा ( Raj Thackeray Rally In Thane ) होते आहे. या सभेच्या आधी कार्यकर्त्यांमध्ये जोश वाढावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( MNS Teaser ) आणखीन एक टीजर रिलीज करण्यात आलेला आहे. या टीजरमध्ये 'वारं खूप सुटलं आहे आणि ते आपलंच आहे' अशा आशयाचा हा टीजर आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश निर्माण करायचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( Maharashtra Navnirman Sena ) केला जातो आहे.
'करारा जवाब मिलेगा' - मनसेने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणावर शरद पवार, अजित पवार व संजय राऊत यांनी केलेल्या टीका दाखवण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज ठाकरे यांच्या फोटोवर राजनीति या चित्रपटातील मनोज वाजपेयी यांचा करारा जवाब मिलेगा, हा डायलॉग यात टाकण्यात आला होता. सभेत ठाकरे पवार राऊतांना करारा जवाब (Pawar Raut to get answer) देतील हे यातून दाखवण्यात आले होते.
नेमकं काय बोलणार राज ठाकरे? - दरम्यान, 12 तारखेच्या भाषणात ठाण्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपल्या मुस्लीम कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज ठाकरे काही या सभेत बोलणार का? तसेच त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर राज ठाकरे 'ठाकरे शैलीत' नेमकं काय उत्तर देतात हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला