ठाणे - गडकरी रंगायतन परिसरामध्ये 9 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर सभा आयोजित करण्यात आले ( Raj Thackeray hold meeting in Thane ) आहे. या सभेसाठी जागा निश्चिती आज करण्यात आली. यासाठी मनसे नेते नितीन सरदेसाई अभिजित पानसे रवी मोरे आणि आयोजक अविनाश जाधव हे आज पोलिसांसोबत या परिसरात पाहणी दौरा केला. त्यांनी गडकरी रंगायतन जवळील जागा निश्चित केली असून या ठिकाणी 9 एप्रिल रोजी संध्याकाळी सहा वाजता सभा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
उत्तर सभेतून सर्वांना उत्तर - पाडव्या मेळाव्यातील भाषणानंतर राज ठाकरे हे विविध माध्यमातून टिकेचे धनी ठरले होते. या सर्व टिकांना उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तर सभा ही विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे, या सभेत गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेल्या भूमिकेवर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचे काम राज ठाकरे करणार आहेत, त्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले असून ही सभा जोरदार होणार असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे अपयश - सभेची जागा निश्चित करून करताना ठाणे शहरात सभेसाठी कोणताही मैदान उपलब्ध नसल्याचे सांगून राज ठाकरे यांच्या सभेसाठी नेहमीप्रमाणे रस्त्यावर सभा घेतली जाणार आहे असे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आणि त्यासोबत सत्ताधारी शिवसेनेवर त्यांनी टीका करत अनेक मैदान गिळंकृत केले असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला.
पोलिसांची परवानगी अजूनही नाही - या सभेसाठी आतापर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची मान्यता दिली नसून ही तातडीने लागलेली सभा पोलिसांची परवानगी घेऊनच होईल अशी माहिती आयोजकांनी दिली. तरी पोलिसांची परवानगी घेण्याचे काम लवकरच होईल असे आज पोलिसांसोबत झालेल्या पाहणी दौऱ्यात दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांकडून सांगण्यात आले.