ETV Bharat / city

Raj Thackeray : भविष्यात मोदींनी काही चुकीच केलं तर मी परत बोलेल - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांची मंगळवारी (दि. 12 एप्रिल) ठाण्यात सभा होत आहे. मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचे नव्हते म्हणून मी सभा घेतली. एक समान नागरी कायदा आणावा आणि लोकसंख्या वाढीवर एक कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : Apr 12, 2022, 8:06 PM IST

Updated : Apr 12, 2022, 10:29 PM IST

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांची मंगळवारी (दि. 12 एप्रिल) ठाण्यात सभा होत आहे. मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचे नव्हते म्हणून मी सभा घेतली. एक समान नागरी कायदा आणावा आणि लोकसंख्या वाढीवर एक कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ते ठाण्यातील 'उत्तर' सभेत बोलत होते.

राज ठाकरे यांनी दिला गृह विभागाला अलटीमेटम - 3 मे पर्यंत भोंगे उतरावा नाहीतर हनुमान चालीसा सुरूच राहील. 3 तारखेला ईद आहे माझे राज्य सरकारला आवाहन आहे. महाराष्ट्राचे स्वास्थ बिघडवायचे नाही सर्व मशिदी वरील भोंगे खाली घ्या. नंतर आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही, असे राज ठाकरे यांनी गृह खात्याला डेड लाईन देऊन स्पष्ट केले. जितेंद्र आव्हाड यांच्या बुद्धीची किव करावी अशी वाटते असेही ते म्हणाले. देशातील प्रामाणिक मुसलमान भरडला जात आहे. 95 टक्के हिंदू वस्तीतून सलीम मामा निवडून येतो. पण यांच्यामुळे तो भरडला जातो.

टीकाकारांचे वाभाडे काढले : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्या दिवशी शिवतीर्थावर केलेल्या टीकेवर सत्ताधाऱ्यासह अनेकांनी टीका केली होती. त्या सर्वाचा समाचार घेण्यासाठी तसेच उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 'उत्तरसभा' मंगळवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोरील डॉ.मूस रोडवर पार पडली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्यावरून टीकेचे आसुड ओढत टीकाकारांचे वाभाडे काढले.

शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्याबाबत संशय : राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तरसभेला पावणे आठ वाजता सुरुवात केली. यावेळी जनतेला संबोधित करताना आता इतकी काही आग लावणार नाही, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी अग्निशमन दलाची गाडी पाहून केले. दरम्यान, माझा ताफा अडवणार आहात हे मला पोलिसांकडून कळालं. हे इंटिलीजन्स एजन्सीला कळालं. मात्र, शरद पवार यांच्या घरी हल्ला होणार हे नाही कळालं, अशा शब्दात पोलिसांवर एकप्रकारे राज ठाकरे यांनी संशय व्यक्त केला.

माझा ट्रॅक बरोबरच : दरम्यान मला ईडीची नोटीस आली म्हणून मी ट्रॅक बदलला असा माझ्यावर आरोप केला. पण मी ट्रॅक नाही बदलला. माझा ट्रॅक बरोबर असून ईडीची नोटीस आल्यावर मी ईडी कार्यालयात गेलो. मी कोणतं ही पाप केलं नाही. त्यामुळे नोटिसा कोणत्याही येवूद्या मी त्याला भीक नाही घालत नसल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद मोदीच्या काही बाबी मला नाही पटल्या म्हणून बोलत होतो. मात्र त्यांनी 370 कलम हटवलं तेव्हा मीच पहिलं अभिनंदन केले होते, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. भविष्यात मोदींनी काही चुकीच केलं तर मी परत बोलेल, असे देखील राज ठाकरे यांनी सांगितलं.

हे घ्या उत्तर

● पावर साहेब खुश झाले कि भीती वाटते असं मी बोललो होतो. संजय राऊत यांच्यावर पवार साहेब खुश आहेत. ते कधी टांगतील हे सांगता येत नाही.

● सुप्रिया सुळे यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असे म्हणत सुप्रिया सुळे यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली. पवार कुटूंबीय एकत्र राहतात मग फक्त अजित पवार यांच्यावर धाडी का पडल्या? असे देखील पवार म्हणाले.

● उत्तर सभेत राज ठाकरे यांनी टीका करणाऱ्या जयंत पाटील यांची मिमिक्री करून सडकून टीका केली.

● छगन भुजबळ - यांना संस्थेमधल्या गैरव्यवहारामुळे जेलमध्ये जावे लागले. आणि जेलमधून बाहेर आल्यानंतर सरकारच्या मंत्रिमंडळात भुजबळ यांना पहिली श्पथ घ्यायला लावली.

सरकारला जमले नाही ते मनसेने केले - वसंत मोरे : पुण्यात कोरोना काळात मनसेने रस्त्यावर उतरून काम केले. जे सरकारला जमले नाही ते काम मनसेने करून दाखवले, असे प्रतिपादन पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी केले. ब्लु प्रिंट काय असते ते कात्रज आणि पुण्यात येऊन पहा, अशी कामे मनसेने केली आहेत. मनसेच्या नेत्यांनी फक्त गाण्यापूरते मर्यादित न राहता लोकांपर्यंत काम पोहचवले पाहिजे, असेही मोरे म्हणाले.

बजरंगबलीच्या वेशात मनसैनिकांची एन्ट्री : हिंदुत्वाची कडवी भूमिका राज ठाकरे यांनी घेतल्याने संपूर्ण देशात राज यांची क्रेज निर्माण झाली आहे, असे सांगत आयोध्या येथील एक हनुमान भक्त थेट हनुमानाच्या वेशातच ठाण्यातील सभेच्या ठिकाणी धडकला. परंतु पोलिसांची त्याला ताब्यात घेतले. अरुणवीर सिंग असे या हनुमान भक्ताचे नाव असून, संपूर्ण अंगाला केशरी रंग फासून बजरंगबलीचे रुप घेऊन त्यांने सभास्थानी प्रवेश केला. हनुमानाच्या वेषात आलेल्या या व्यक्तीमुळे मनसेची वाटचाल हिंदुत्वाकडे असल्याचे अधोरेखित झाले. या हनुमानाने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. राज ठाकरे यांच्या कडव्या हिंदुत्व भूमिकेमुळे आणि त्यांच्या ठाकरी भाषा शैलीमुळे आपण त्यांचे फॅन झाल्याचे त्याने आवर्जून नमुद केले.

Last Updated : Apr 12, 2022, 10:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.