ETV Bharat / city

ठाणे : कोपरी पुलाला पडले तडे; निकृष्ट बांधकाम झाल्याचा आरोप करत मनसेचे आंदोलन - ठाणे मनसे आंदोलन

ठाण्यात गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असली तरीही तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाण्याची ओळख खड्ड्यांचे शहर अशी झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे डोळे उघडत नाहीत. रस्ते बनताच खड्डे पडतात. याला जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि अभियंत्यांवर गुन्हे दखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

ठाणे मनसे आंदोलन
ठाणे मनसे आंदोलन
author img

By

Published : Sep 21, 2021, 3:54 PM IST

Updated : Sep 21, 2021, 4:06 PM IST

ठाणे - 250 ते 300 कोटी खर्च केले तरीही कोपरी पुलाला तडे पडल्याने वाहनचालकांचे प्राण धोक्यात आले असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात आंदोलन केले. कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावर बांधण्यात आलेल्या पुलाचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाले आहे. त्यामुळे संपूर्ण पुलाला उभे तडे गेल्याने हा पूल कधीही कोसळू शकतो अशी भीती, ठाणे पालघरचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी व्यक्त केली.

'...तर मोठा अनर्थ'

या पुलावरून अद्याप अवजड वाहतूक सुरू झाली नसली तरीही पुलाला तडे गेले आहेत. परंतु उद्या ट्रक आणि कंटेनरसारखी अवजड वाहने सुरू झाल्यावर धोका निर्माण होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे या पुलाखालून रेल्वे जात असल्याने जर हा पूल कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो, अशी भीती जाधव यांनी व्यक्त केली.

'ठेकेदार-अभियंत्यांवर गुन्हे दाखल करावे'

ठाण्यात गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असली तरीही तलावांचे शहर अशी ख्याती असलेल्या ठाण्याची ओळख खड्ड्यांचे शहर अशी झाली आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तरीही सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांचे डोळे उघडत नाहीत. रस्ते बनताच खड्डे पडतात. याला जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि अभियंत्यांवर गुन्हे दखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

मनसेच्या आंदोलनानंतर दुरुस्ती

जुलैच्या 15 तारखेला या नवीन लेनचे उद्घाटन होणार होते, मात्र त्याआधी मनसेने आंदोलन करून या ठिकाणी पडलेल्या नवीन कामाच्या भेगा प्रशासनाला दाखवून दिल्या. त्यानंतर प्रशासनाने दुरुस्तीसाठी उद्घाटन पुढे ढकलले. हे उद्घाटन आजतागायत झाले नसून आता मनसेने पुन्हा नव्याने आंदोलन करून या कामाची पोलखोल केली आहे.

Last Updated : Sep 21, 2021, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.