ETV Bharat / city

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात, वाशी टोल नाक्याजवळची घटना - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे अपघातात जखमी

नगरविकास मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

minister-eknath-shinde-injured
अपघातग्रस्त गाडी
author img

By

Published : Dec 25, 2020, 8:11 PM IST

ठाणे - राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा गुरुवारी वाशी येथे अपघात झाला. सुदैवाने या अपघातात एकनाथ शिंदे बचावले असून त्याच्या हाताला थोडा मार लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातात लॅन्ड क्रूझर गाडीच्या बोनेटचे नुकसान झाले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पालघर येथे अघोरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांतच हा अपघात झाला असल्याने ठाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ताफ्यासह गुरुवारी संध्याकाळी वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जात होते, ऐरोली - काटाई रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करून मुंबईच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडी फार दुखापत झाली असून आता प्रकृती स्थिर व व्यवस्थित असल्याचे सूत्रांनी सांगितले.

minister-eknath-shinde-injured
अपघातग्रस्त गाडी

जव्हार येथे शिंदेवर अघोरी जादुटोण्याचा प्रयत्न -

विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याच्या हेतूने त्यांचा जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला जात असल्याचा दावा केला जात होता.

minister-eknath-shinde-injured
अपघातग्रस्त गाडी

अघोरी पूजा करणाऱ्या दोघांना अटक -

अघोरी पूजा करणाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.