ठाणे - कोरोनाचा परिणाम अनेक वस्तूंवर होताना दिसतोय. यामध्ये दूध विक्रेत्यांनाही याच मोठा फटका बसला आहे. एकीकडे दूध उत्पादक संघाकडून वेळोवेळी दुधाच्या विक्रीदरात एकतर्फी वाढ करण्यात आली आहे. तर, दुसरीकडे मात्र दूधविक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. आता फक्त अडीच ते तीन टक्के कमिशन त्यांना मिळत आहे. यापुढे हे कमिशन दहा टक्के मिळावे अशी मागणी दूध विक्रेत्यांनी केली आहे. अन्यथा, दूधविक्रीवर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेकडून देण्यात आला आहे.
दूधविक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम
ठाणे शहरात सुमारे ५०० पेक्षा अधिक दूधविक्रेते आहेत. करोना काळात दुधावाचून कोणाची परवड होऊ नये, यासाठी जीव धोक्यात घालून दूधविक्रेत्यांनी दुधाचा पुरवठा केला. जवळपास ५०० दूध विक्रेते ठाण्यात आहेत. करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षांपासून दूधविक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. दूध उत्पादक संघाकडून वेळोवेळी दुधाच्या विक्रीदरात एकतर्फी वाढ करण्यात आली आहे. परंतु, दूधविक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही.
दरवाढ होतेय मात्र कमिशन वाढ नाही
दरवर्षीप्रमाणे यंदाही दुधाच्या विक्री दरात दोन रुपये प्रतिलिटर अशी दरवाढ करण्यात आलेली आहे. दूध विक्रेत्यांना मिळणाऱ्या अल्प कमिशनमध्ये व्यवसाय करणे कठीण होत आहे. गेल्या सात ते आठ वर्षांत पेट्रोल, डिझेल, कामगारांचे पगार, वीजबिलामध्ये दामदुपटीने वाढ झाली आहे. वाढत्या महागाईमध्ये कमिशनमध्ये मात्र, वाढ झालेली नाही. दूधविक्रेत्यांना विक्रीच्या दरावर किमान १० टक्के कमिशन द्यावे. अन्यथा, दूधविक्रीवर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा इशारा ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.