ETV Bharat / city

Thane : भिवंडीतील 'त्या' बंडखोर नगरसेवकांबाबत आज एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक, पद रद्दतेची कारवाई होणार? - भिवंडी काँग्रेस नगरसेवक बंडखोरी

भिवंडी महापालिकेत 2019 साली झालेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी ( 2019 Congress Corporators Rebellion ) करून कोणार्क विकास आघाडीच्या ( Congress Corporator Vote For Konark Vikas Aaghadi ) उमेदवाराला मतदान केले होते. या प्रकरणाची सुनावणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात ठेवण्यात आली आहे.

Congress Corporators Rebellion In Bhiwandi

author img

By

Published : Feb 4, 2022, 4:03 PM IST

ठाणे - भिवंडी महापालिकेत 2019साली झालेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी ( 2019 Congress Corporators Rebellion ) करून कोणार्क विकास आघाडीच्या ( Congress Corporator Vote For Konark Vikas Aaghadi ) उमेदवाराला मतदान केले होते. त्या बंडखोर 18 नगरसेवकांची ( Hearing In Eknath Shinde Office ) सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज दुपारी 3 वाजता नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात ठेवण्यात आली आहे. यामुळे त्या 18 नगरसेवकांच्या पदरद्दतेची टांगती तलवार कायम आहे.

...म्हणून बंडखोरांचा राष्ट्रवादीत प्रवेश -

आज मंत्रालयात होणाऱ्या सुनावणीसाठी कालच नगरविकास सचिवांनी त्या बंडखोर 18 नगरसेवकांसह कोकण आयुक्त आणि संबधीत वकील यांना सुनावणी वेळी हजर राहण्याचे नोटीसवजा आदेश एका पत्राद्वारे कळविण्यात आले. तसेच सुनावणी वेळी गैरहजर राहिल्यास आपले काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही नमूद केले आहे. विशेष म्हणजे या 18 नगरसेवकांनी नगरसेवक पद कायम राहावे म्हणून काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

कोकण आयुक्तांनी दिला होता 'हा' निर्णय -

गेल्याच महिन्यात कोकण आयुक्तांनी या 18 नगरसेवकाच्या बाजूने निकाल देत, त्यांचे पद कायम असल्याचे आदेश दिले होते. त्यावेळी या नगरसेवकांनी शहरात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला होता. मात्र, आजच्या सुनावणी वेळी नगरविकास मंत्री काय निर्णय देतील, याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - UP Election 2022 : 'एक दुआ-सलाम तहज़ीब के नाम', अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आमने-सामने; कार्यकर्त्यांचा जल्लोष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.