ETV Bharat / city

ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली- किरीट सोमय्या

author img

By

Published : Mar 17, 2021, 4:55 PM IST

ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे.

mansukh-hiren-was-assassinated-by-the-waze-gang-says-kirit-somaiya
ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली- किरीट सोमय्या

ठाणे - ठाकरे सरकारच्या वाझे गँगने मनसुख हिरेन यांची हत्या केली, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी शहरातील कोविड लसीकरण केंद्रांना भेटी देण्यासाठी किरीट सोमय्या भिवंडीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी ठाकरे सरकारवर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोप केला.

वाझे गँगकडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या-

पुढे बोलतांना सोमय्या म्हणाले कि, आपण कालचं हिरेन परिवाराची भेट घेतली असून या भेटी दरम्यान हिरेन परिवार प्रचंड तणावात असल्याचे मला आढळले. ठाकरे सरकारच्या वाझे गँगकडून त्यांच्या पत्नी व परिवाराला धमक्या येत आहेत. त्यामुळे हिरेन परिवाराला सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी विनंती व मागणी लेखी पत्राद्वारे आपण एनआयए यंत्रणा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी अपारदर्शकपणे व घाईघाईने ५ जून २०२० रोजी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेतले यामागे नेमका काय हेतू होता, याची देखील चौकशी व्हावी, अशा मागणीचे पत्र देखील आपण एनआयएला दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार-

मृतक हिरेन प्रकरणात भाजपचा हात असल्याचा आरोप व ट्विट काँग्रेसचे सचिन सावंत यांनी केला. याबत सोमय्या यांना विचारले असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख व काँग्रेसचे सचिन सावंत हे हिरेन प्रकरण भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार तुमचे, पोलीस तुमचे वाझेही तुमचाच मग हिरेन प्रकरणात पंधरा दिवस सरकार व पोलीस झोपा काढत होते काय? की हे सर्व जण ५० कोटींच्या वासुलीत व्यस्त होते, असा प्रती सवाल व आरोप सोमय्या यांनी केला. तसेच सचिन वाझेचा बोलविता धनी देखील तुरुंगात जाणार असल्याचा विश्वास सोमय्या यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- जळगाव सत्तासंघर्ष : शिवसेनेकडून महापौर पदासाठी जयश्री महाजन; उपमहापौर पदासाठी कुलभूषण पाटील यांचे अर्ज दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.