ETV Bharat / city

ठाण्यात पत्रीपुलाजवळ ट्रॅकमनच्या सतर्कतामुळे रेल्वेची दुर्घटना टळली, कल्याण पत्रीपुलाजवळील रुळाला तडा

पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेला होता. ही घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मात्र या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या ट्रॅकमनला रेल्वे रुळावर तडा गेल्याचे दिसताच तात्काळ समोरून येणाऱ्या एक्स्प्रेसला लाल झेंडा दाखवला (vigilance of trackman in Thane) आणि एक्स्प्रेस थांबवली. त्यामुळे रेल्वेच्या अपघाताची मोठी दुर्घटना टळली (Major accident of train averted).

ठाण्यात पत्रीपुलाजवळ ट्रॅकमनच्या सतर्कतामुळे रेल्वेची दुर्घटना टळली

author img

By

Published : Sep 6, 2022, 3:14 PM IST

ठाणे : कल्याण पत्री पुलाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची घटना आज सकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. मात्र या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या ट्रॅकमनला रेल्वे रुळावर तडा गेल्याचे दिसताच तात्काळ समोरून येणाऱ्या एक्स्प्रेसला लाल झेंडा दाखवून एक्स्प्रेस थांबवली (vigilance of trackman in Thane). त्यामुळे रेल्वेच्या अपघाताची मोठी दुर्घटना टळली (Major accident of train averted). दरम्यान, रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती मिळतात रेल्वे प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती काम हाती घेतले. पाऊण तासातच रेल्वे रुळांची दुरुस्ती करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.

ठाण्यात पत्रीपुलाजवळ ट्रॅकमनच्या सतर्कतामुळे रेल्वेची दुर्घटना टळली
ठाण्यात पत्रीपुलाजवळ ट्रॅकमनच्या सतर्कतामुळे रेल्वेची दुर्घटना टळली

ट्रॅकमनचे प्रसंगावधान - कल्याण रेल्वे स्थानकानजीक पत्रीपुलाजवळ रेल्वे रुळाला सकाळी ६.३५ वाजता तडा गेल्याचे लक्षात आले. त्यावेळी या परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या रेल्वे कर्मचारी हिरा लाल आणि मिथुन कुमार यांना पत्रीपुलजवळ रुळाला तडा गेल्याचे दिसले. दुसरीकडे या रुळावरून समोरून एक्स्प्रेस येत होती. त्याचवेळी मिथुन याने प्रसंगावधान राखत तात्काळ या एक्सप्रेसला लाल झेंडा दाखवला. त्यामुळे ही एक्सप्रेस थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. त्यानंतर या दोघांनी या घटनेबाबत रेल्वे कंट्रोल रुमला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुरूस्तीचे काम हाती घेतले.

पाऊण तास वाहतूक विस्कळीत - पाऊण तासानंतर सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा रेल्वे रूळ दुरुस्त झाला व या मार्गावरून वाहतूक मार्गस्थ करण्यात आली. या दरम्यान या मार्गावरील रेल्वे वाहतूक दुसऱ्या ट्रॅकवर वळविण्यात आली होती. या सगळ्यामुळे मात्र मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. सर्वच रेल्वे व लोकल गाड्या उशिरा धावत आहेत. सकाळच्या वेळेत पुणे, नाशिक दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेस, कर्जत, कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली, डोंबिवली, दिवा, मुंब्रा परिसरात खोळंबल्या होत्या. पाऊण तास एकही लोकल रेल्वे स्थानकात न आल्याने डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, कोपर, मुंब्रा, ठाणे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. सकाळीच कामावर जाण्याची घाई असलेल्या प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा झाली. रेल्वे स्थानके प्रवाशांनी तुंडुंब भरली असतानाच सकाळी पाऊस आणि घामाच्या धारांनी प्रवासी हैराण झाले होते.

हेही वाचा - farewell to Ganaraya ठाण्यात जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ ओलांडत भक्तांचा गणरायाला निरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.