ETV Bharat / city

Uddhav Thackeray birthday : संतापजनक प्रकार; उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा वापर, शाळेत दिल्या घोषणा - Maharashtra Politics

Maharashtra Politics : एका शालेय आयोजित कार्यक्रमात चक्क ठाण्याचे शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक राजन विचारे यांची पत्नी शिवसेना माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांनी शाळकरी लहान विद्यार्थ्यांकडुन उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावाच्या घोषणा दिल्या असल्याचा प्रकार समोर

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा वापर

author img

By

Published : Jul 27, 2022, 7:50 AM IST

ठाणे - महाराष्ट्रात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या राजकीय रस्सीखेच सुरू आहे. एका ठाण्यातील शालेय आयोजित कार्यक्रमात शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक राजन विचारे यांची पत्नी शिवसेना माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांनी शाळकरी लहान विद्यार्थ्यांकडुन उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या नावाच्या घोषणा दिल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. आता शाळकरी मुलांना देखील वेठीस धरून त्यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा वदवून घेतल्या असल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्याने राज्यातील राजकारण ( State politics ) कोणत्या दिशेने जात आहे असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांचा वापर

राज्यातील दोन गटातील वाद विकोपाला- एकीकडे शिवसेनेतून बंडखोरी ( Rebel MLA of Shiv Sena ) करत बाहेर पडलेला एकनाथ शिंदे गट शिवसेना पक्षावर निर्विवाद वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न करत असतांनाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) आपल्या उरलेल्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांना रोखून धरण्याचे शिवधनुष्य पेलत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. त्यातच आता कट्टर शिवसेना समर्थकांनी आपली ताकत दाखविण्याचा प्रयत्न सुरु केल्याने या दोन गटातील वाद किती विकोपाला गेला आहे, ते स्पष्ट दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ठाण्यातील एका शाळेत उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांकडुन उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा - उद्धव ठाकरे यांच्यावरील आपले प्रेम दाखवत केक कापून लहान मुलांना शैक्षणिक साहित्याच वाटण्यात आले आहे. परंतु, यावेळी आयोजित कार्यक्रमात मात्र कळस करत चक्क ठाण्याचे शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे यांचे समर्थक राजन विचारे यांची पत्नी शिवसेना माजी नगरसेविका नंदिनी राजन विचारे यांनी शाळकरी लहान विद्यार्थ्यांकडुन उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा दिल्या असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराचे व्हिडीओ आता viral झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. अशाप्रकारे लहानग्यांना वेठीस धरत त्यांच्याकडून अशा घोषणा करवून घेणे किंवा राज्यातील राजकारण लहान विद्यार्थ्यांच्या वर्गापर्यंत नेणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत आहेत.

हेही वाचा - State Wrestling Association : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत शरद पवारांना धक्का; भाजपचे खासदार रामदास तडस होणार अध्यक्ष

हेही वाचा - Eknath Shinde vs Uddhav Thackeray: पालापाचोळ्यांनीचं इतिहास घडवला; एकनाथ शिंदेंचा पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.