ठाणे - प्रसार माध्यमांनी आधीच ( Maharashtra cabinet Expansion ) खातेवाटप करून टाकले. आमच्यासाठी काही ( Devendra Fadnavis on portfolio distribution ) शिल्लकच ठेवले नाही. तुम्ही जे खातेवाटप ( eknath shinde cabinet expansion ) केले आहे ते सपशेल चुकीचे ठरेल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस हे ठाण्यात एका वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. भाजप पक्ष कधीही ( Devendra Fadnavis reaction to media portfolio distribution ) मित्र पक्षांना धोका देत नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पवारांनी पक्ष बदलला तेव्हा कायदे नव्हते, मात्र.. - आमचा मित्र शिवसेना ( Devendra Fadnavis react to media portfolio distribution ) याच्याकडे 50 लोक आहेत. आम्ही 150 लोक आहोत. आम्ही त्यांना मुख्यमंत्री पद दिले. काल त्यांचे 9 आणि आमचे 9 अशा मंत्र्यांची शपथ झाली आहे. त्यामुळे पवार साहेबांचे दुःख जरा वेगळे आहे. पवारांनी ज्यावेळी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. कोणाला कसेही बदलता येत होते. आज कायदे तयार झाल्याने कायदेशीर लढाई करावी लागते. आणि ती कायदेशीर लढाई मुख्यमंत्री करत आहेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच, बिहारमध्ये आज सरकार नसेल तर उद्या येईल, असा आत्मविश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी बिहारच्या राजकीय परिस्थितीवर व्यक्त केला.
फडणवीसांना गृह व वित्त खातं? - शिंदे - फडणवीस सरकारच्या ( Eknath shinde cabinet minister portfolios ) मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काल झाला असून, आता या सर्वच मंत्र्यांकडे ( probable portfolio of cm eknath shinde ) कुठली खाती असणार याबाबत चर्चा ( shinde cabinet expansion ) रंगू लागली आहे. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ( eknath shinde ministry portfolio ) नगर विकास व सामान्य प्रशासन ही खाती राहणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त ही खाती राहणार आहेत.
महत्त्वाची खाती भाजपकडे? - शिंदे गटाच्या अपात्र आमदारांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याकारणाने मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत आहे, असे सांगितले जात होते. परंतु, काल ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे यावरून स्पष्ट झाले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा व मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नव्हता. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गृह, वित्त, महसूल ही खाती कोणाकडे राहणार याबाबत एकमत नव्हते. अखेरकार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करून भाजपने गृह, वित्त व महसूल ही महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यात यश प्राप्त केले आहे.
हेही वाचा - Bhatsa Dam: मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाण्याला 'तिरंग्याचा' रंग