ठाणे - भारतीय हवामान विभागाने कालपासून कोकण पट्ट्यात ( Heavy rain Thane ) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच, यावर्षीही पावसाची सरासरी १०० ते १०५ टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावली. परंतू, मध्यंतरी दांडी मारली होती. मात्र, सोमवारी दूपारपासून रात्रीपर्यत जोरदार पाऊस कोसळल्याने भिवंडी आणि कल्याण ( Kalyan rain news ) शहरात ठिकठिकाणी सखल भाग पाण्याखाली ( Heavy rain in Kalyan ) जाऊन जलमय झाला होता, त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले होते.
हेही वाचा - VIDEO : नवी मुंबईत मुसळधार पाऊस, खांदेश्वर रेल्वे स्थानकात शिरले पाणी
भिवंडीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत - भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात काल दूपारपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. दरम्यान यावर्षी नाले सफाईची पहिल्याच पावसाने पोलखोल केली आहे. नाले, गटारातील पाणी रस्त्यावर आले आहे. शहरातील निजामपुरा, कणेरी, कमला हॉटेल, नारपोली, पद्मानगर, तीनबत्ती, शिवाजी नगर, सिटीजन हॉस्पिटल मेनरोड, शास्त्रीनगर, आनंद हॉटेल मागील नाला, वरालदेवी हॉस्पिटल मेनरोड, भाजीमार्केट, नजराना कम्पाउंड आदी सखल भागात पाणी साचले होते. तर, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याणरोड, अंजूरफाटा, रांजणोली बायपास नाका, माणकोली नाका, वंजारपट्टीनाका, नारपोली, नझराना सर्कल, भिवंडी - वाडा रोडवरील नदीनाका, खाडीपार अशा विविध मार्गांवरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती.
कल्याणमधील ४०० घरे पाण्याखली - कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावत तीन तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचून डोंबिवलीतील नांदीवली, कल्याण पूर्वेकडील मलंग रोड आडीवली ढोकली परिसरातीला ४०० घरे पाण्याखाली जाऊन परिसर जलमय झाला. आडीवली ढोकली समर्थ नगर ऑस्टिन नगरमधील चाळींमध्ये पाणी शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरात नाले रुंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते आहे, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना पाण्यात दिवस काढवे लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. तर, डोंबिवलीमधील नांदिवली परिसरात देखील पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरड कोसळल्याचीही घटना - कल्याण पूर्व भागातील 'ड' प्रभाग कार्यालयाच्या मागच्या बाजूला असलेल्या हनुमाननगर नजिकच्या टेकडीवरून दरड कोसळल्याची घटना सायंकाळी घडली. या घटनेत जीवित हानी झालेली नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने घटना घडलेल्या परिसरातील पाच कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तर, काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पावसाने जोर धरल्याने सखल भागातील नागरिक धास्तावले आहेत.
हेही वाचा - Fake Call : रेल्वे स्थानकावर बॅगेत बॉम्ब ठेवल्याच्या कॉल; पोलिसांची रात्रभर पळापळ, कॉल करणारे दोघेही अटक