ETV Bharat / city

नवी मुंबई व पनवेलमध्ये पुन्हा दहा दिवसांचे लॉकडाऊन; १३ जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी - lockdown extended in navi mumbai

नवी मुंबई शहरात आठ दिवसात म्हणजेच २४ जून ते १ जुलै दरम्यान १ हजार ७५१ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल शहर व परिसरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून लाॅकडाऊन ३ जुलै ते १३ जुलै पर्यंत वाढवण्यात आले आहे.

navi mumbai municipal corporation
नवी मुंबई व पनवेलमध्ये पुन्हा दहा दिवसांचे लॉकडाऊन; १३ जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी
author img

By

Published : Jul 2, 2020, 1:34 PM IST

Updated : Jul 2, 2020, 5:01 PM IST

ठाणे - नवी मुंबई शहरात आठ दिवसात म्हणजेच २४ जून ते १ जुलै दरम्यान १ हजार ७५१ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले असून ४० जणांचा मृत्यू झाला आहे. पनवेल शहर व परिसरातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने दोन्ही महापालिकांच्या माध्यमातून लाॅकडाऊन ३ जुलै ते १३ जुलै पर्यंत वाढवण्यात आले आहे. मात्र, मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती असणार आहे. ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहत देखील सुरू राहणार असल्याची माहिती नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.

नवी मुंबई व पनवेलमध्ये पुन्हा दहा दिवसांचे लॉकडाऊन; १३ जुलैपर्यंत कडक अंमलबजावणी
नवी मुंबई व पनवेल शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पनवेल व नवी मुंबई महापालिकेने ३ ते १३ जुलैदरम्यान १० दिवसांचे लॉकडाऊन घोषित केले. पनवेल महानगरपालिका व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ३ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी महानगरपालिका प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने परिस्थिती पूर्वपदावर येण्यास अडचणी जाणवत आहेत.

नवी मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६ हजार ८२३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २१७ जणांचा मृत्यू झाला असून पालिकेने १२ ठिकाणी विशेष लॉकडाऊन सुरू केले आहे. परंतु याव्यतिरिक्त शहरातील इतर ठिकाणी देखील रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून दहा दिवस संपूर्ण नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते १३ जुलैदरम्यान संपूर्ण नवी मुंबईमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने सुरू राहणार आहेत. या कालावधीत कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम व औषध फवारणीची सुरुवात होणार आहे.

पनवेलमधील परिस्थिती चिंताजनक

पनवेल महापालिका क्षेत्रात २ हजार २७७ रुग्ण आढळून आले असून ७७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागातसुद्धा लॉकडाऊन करण्यात आले आहे. पनवेल परिसरातील उलवे विचुंबे, पालीदेवद, सुकापूर, करंजाडे, आदई, उसर्ली व आकुर्ली या ठिकाणी ३ ते १३ जुलैदरम्यान लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत जीवनावश्यक वस्तू, भाजी, औषधांसह विविध जीवनावश्यक वस्तूंचा दहा दिवस पुरेल, इतका साठा करून ठेवण्याचे आवाहन पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.

Last Updated : Jul 2, 2020, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.