ठाणे : उल्हासनगर परिसरातील भरत नगर, सोग्यांची वाडीत परिसरामध्ये काल (मंगळवारी ) रात्रीच्या सुमारास बिबट्या ( Leopard in Ulhasnagar ) लहान मुलीला दिसला. तिने याबाबत माहिती घरच्यांना दिली. परिणामी, नागरिकांध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळताच वन पथक व स्थानिक पोलीस त्या बिबट्याचा शोध सुरु केला आहे.
Leopard in Ulhasnagar : मानवी वस्तीत बिबट्याची दहशत; वन विभागाची शोध मोहीम सुरु - वन विभागाची शोध मोहीम
गेल्या आठवड्यात अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट परिसरात सोमवारी रात्री हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV caught leopard) झाला होता. बिबट्यामुळे मनुष्य हानी होऊ नये यासाठी वन विभाग आता परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
![Leopard in Ulhasnagar : मानवी वस्तीत बिबट्याची दहशत; वन विभागाची शोध मोहीम सुरु Leopard in Ulhasnaga](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14165179-420-14165179-1641973780040.jpg?imwidth=3840)
Leopard in Ulhasnagar
ठाणे : उल्हासनगर परिसरातील भरत नगर, सोग्यांची वाडीत परिसरामध्ये काल (मंगळवारी ) रात्रीच्या सुमारास बिबट्या ( Leopard in Ulhasnagar ) लहान मुलीला दिसला. तिने याबाबत माहिती घरच्यांना दिली. परिणामी, नागरिकांध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती वन विभागाच्या पथकाला मिळताच वन पथक व स्थानिक पोलीस त्या बिबट्याचा शोध सुरु केला आहे.
मानवी वस्तीत बिबट्याची दहशत
दोन महिन्यांपासून अंबरनाथ, बदलापूर, कल्याण परिसरातील ग्रामीण भागात ज्या बिबट्याने दहशत निर्माण केली. त्या बिबट्याने मानवी वस्तीत दुसऱ्यांदा शिरकाव केला आहे. गेल्या आठवड्यात अंबरनाथच्या ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट परिसरात सोमवारी रात्री हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (CCTV caught leopard) झाला होता. त्यावेळी शिकार केल्यानंतर बिबट्या पुन्हा जंगलात जात असल्याने वन विभागाने त्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. मात्र हा बिबट्या आता थेट मानवी वस्तीत दुसऱ्यांदा शिरल्याचे बोलले जात आहे.
तोपर्यंत पिंजरे लावता येत नाही
वन विभागाच्या नियमाप्रमाणे जोपर्यंत बिबट्या मानवी वस्तीत शिरकाव करत नाही. तोपर्यंत पिंजरे लावता येत नाही. आता या बिबट्याने मानवी वस्ती शिरकाव केल्याने वन विभाग सतर्क झाली आहे. बिबट्यामुळे मनुष्य हानी होऊ नये यासाठी वन विभाग आता परिसरात नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. गेल्या दोन महिन्यात या बिबट्याने ७ ते ८ शेळ्या वासरासह एका गायीची शिकार केली आहे. हेही वाचा - Hemant Birje Car Accident : बॉलिवूडमधील 'टार्जन' हेमंत बिर्जे यांच्या कारचा अपघात, किरकोळ जखमी