ETV Bharat / city

दसऱ्याच्या निमित्ताने वाहनखरेदीसाठी मोठी गर्दी; अनेक वाहनांना आहे मोठी वेटिंग लिस्ट

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होते. यावर्षी मिशन ब्रिगेडमध्ये वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे वाहनांच्या वेटिंग लिस्टमध्ये भर पडलेली आहे.

vehicle purchase on the occasion of Dussehra
दसऱ्याच्या निमित्ताने वाहनखरेदीसाठी मोठी गर्दी; अनेक वाहनांना आहे मोठी वेटिंग लिस्ट
author img

By

Published : Oct 15, 2021, 9:18 PM IST

Updated : Oct 15, 2021, 10:37 PM IST

ठाणे - साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याच्या दिवशी वाहन खरेदीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. यावर्षी अॅटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची मागणी वाढली असताना, पुरवठा करण्यात न झाल्याने सर्व कंपन्यांच्या वाहनांची मागणी अधिक प्रमाणात वाढली आहे. यामुळेच तीन महिन्यांपासून ते आठ महिन्यांपर्यंत वाहनांची मोठी वेटिंग लिस्ट पाहायला मिळत आहे. ठाण्यातील मोदी हुंडाई या शोरूममध्ये याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने वाहनखरेदीसाठी मोठी गर्दी; अनेक वाहनांना आहे मोठी वेटिंग लिस्ट

पुढील वर्षीच्या आठ महिन्यांची वाहनांची बुकिंग -

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लॉकडाऊन करण्यात आला होता. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या आणि उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. यावर्षी मिशन ब्रिगेडमध्ये वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि मागणीची पूर्तता होत नसल्यामुळे वाहनांच्या वेटिंग लिस्टमध्ये भर पडलेली आहे. ठाण्यातील मोदी होंडाई या शोरूममध्ये होंडाई कंपन्यांच्या गाड्यांसाठी तीन महिन्यांपासून ते आठ महिन्यांपर्यंतची वेटिंग लिस्ट पाहायला मिळत आहे, यावर्षी दसऱ्याच्या निमित्ताने अनेक खरेदीदार ग्राहक पुढील वर्षीच्या आठ महिन्यांची वाहनांची बुकिंग करताना दिसत आहेत.

अचानक वाढली मागणी -

लॉकडाउन नंतर अनेक अॅटोमोबाईल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली. यामुळे त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आणि उत्पादन घटले, घटलेल्या उत्पादनानंतर अचानक ग्राहकांची मागणी वाढली त्यामुळे पुरेसा पुरवठा न झाल्याने ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची वेटिंग लिस्ट तयार झाली आहे.

ठाण्याच्या शोरूममध्ये वाहनांची मागणी वाढली -

मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होता आणि त्यामुळे अनेक नागरिकांच्या ग्राहकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे अॅटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये मागणी नव्हती. यावर्षी याउलट मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, मागील वर्षी 30 वाहनांची विक्री केलेल्या ठाण्यातील याच शोरूममध्ये यावर्षी दसऱ्याच्या दिवशी शंभर वाहन ग्राहकांना दिलेली आहेत.

हेही वाचा - विजयादशमीला 'या' गावात रावणाचे दहन न करता पारंपारिक पद्धतीने केली जाते पूजा

Last Updated : Oct 15, 2021, 10:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.