ठाणे डोंबिवलीतील गोपाळनगर शाखेतील आनंद प्रेम नागरी सहकारी पतसंस्थेमधील १० सभासदांच्या तिजोरीतील २८८ ग्रॅम, १३ लाख ६२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर याच पतसंस्थेच्या एका महिला कर्मचाऱ्याने डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे. ( Dombivli Crime ) पतसंस्था व्यवस्थापनाने याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार ( Tilaknagar Police Station ) केली आहे. यशश्री नवनाथ शिंदे (२१, रा. ठाकुर्ली, डोंबिवली पू्र्व) असे आरोपी महिला लिपीकाचे नाव आहे.
दागिन्यांवर महिला लिपिकाचा डल्ला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील पूर्वे कडील भागात आनंदप्रेम नागरी पतपेढी आहे. या पतसंस्थेतील १० सभासदांनी आपल्या घरातील एकूण २८७.८०० ग्रॅम सोन्याचे दागिने गोपाळनगर पतसंस्थेत ठेव, तारण स्वरुपात ठेवले होते. ( Dombivli Crime ) पतसंस्थेत लिपिक म्हणून काम करणाऱ्या आरोपी महिला यशश्री शिंदे यांनी पतसंस्थेतील व्यवस्थापनाला काहीही कळू न देता, पतसंस्थेतील तिजोरीच्या चाव्या गुपचूप ताब्यात घेतल्या आहेत. २७ ऑगस्ट रोजी सकाळी कार्यालय सुरू झाल्यावर तिजोरीतील सोन्याचे दागिने काढून घेतले. पतसंस्थेचे व्यवस्थापक गजानन रामचंद्र बोबडे यांच्या हा नंतर प्रकार निदर्शनास आला.
गुन्हा दाखल करुन तपास सुरू पतसंस्था कार्यालयाचा कडीकोयंडा सुरक्षित असताना, कोठेही चोरीचे धागेदोरे दिसत नसताना दागिने चोरीला गेले कसे ? याचा तपास पतसंस्था व्यवस्थापनाने सुरू केला आहे. या अंतर्गत चौकशीत लिपीक यशश्रीने हे दागिने चोरले, ( Dombivli Crime ) असल्याची खात्री पटल्यावर व्यवस्थापक गजानन बोबडे यांनी यशश्री विरुध्द चोरीचा तक्रार टिळकनगर पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.