ठाणे - केतकी चितळे हिला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती. आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि न्यायालय परिसरामध्ये तैनात होता.
केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट - फेसबुकवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर कळवा पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी तिला कळंबोली येथून अटक केली. अटक झाल्यानंतर तिचा प्रवास गुन्हे शाखा आणि ठाणे नगर पोलिस ठाणे असा होता. अटक झाल्या-झाल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी केली होती. कळंबोली येथील झालेला हल्ल्याचा प्रकार पाहता पोलिसांनी सुरुवातीपासूनच केतकी हा मोठा बंदोबस्त दिला होता.
केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जामीन मिळण्याच्या आशेवरती गोरेगाव पोलीस झाले न्यायालयात हजर - केतकीला सुनावणीदरम्यान जामीन मिळू शकतो ही शंका गोरेगाव पोलिसांना असल्यामुळेगोरेगाव पोलिस तिचा ताबा घेण्यासाठी आले होते. केतकीवर 153,501,505 अन्वये १४ मे रोजी गोरेगाव पुलिस स्टेशन मध्ये दाखल झाला होता गुन्हा.
कोर्टाची परवानगीने पुन्हा घेता येऊ शकत ताब्यात - केतकीची काल गुन्हे शाखेने जवळपास आठ तास चौकशी केली. सायबर सेलकडून तिच्या लॅपटॉप आणि मोबाईलचा रिपोर्ट येणे बाकी असल्यामुळे तपास करण्यासाठी आणखीन अडथळे येत होते. त्यामुळे भविष्यात जर गरज पडली तर न्यायालयाची परवानगी घेऊन केतकीला गुन्हे शाखा पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेऊ शकते.