ETV Bharat / city

भिवंडीतील कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण; श्रेयवादाची लढाई सुरू - भाजपा लेटेस्ट न्यूज

कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल पूर्ण झाला असून उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा या दोन पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सोमवारी या उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन लोकार्पण करणार आहेत. त्यापूर्वीच, भाजपा आमदार महेश चौघुले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या पुलाचे लोकार्पण केले.

bjp inagurated way bridge
भाजपाकडून उड्डाणपुलाचे लोकार्पण
author img

By

Published : Sep 19, 2020, 6:23 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील वाहतुकीची वर्दळ वाढलेली असल्याने कल्याण नाका ते साईबाबा या रस्त्यावरील उड्डाणपूल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर करून भूमिपूजन केले होते. आता उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून उद्घाटनावरून शिवसेना-भाजपा यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उड्डाणपुलाचे ऑनलाइन लोकार्पण करणार आहेत. मात्र, आज भाजपा आमदार महेश चौघुले व शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांनी कार्यकर्त्यांसह उड्डाणपुलाचे लोकार्पण केले आणि वाहनांना झेंडा दाखवत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला.

कल्याण नाका-साईबाबा रस्त्यावरील उड्डाणपुलाचे भाजपाकडून लोकार्पण

स्थानिक आमदारांना डावलून एमएमआरडीए या पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करणार आहे. कोरोना काळात बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांना दीड महिन्यापूर्वी तयार झालेल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून कोरोनासाठी वेळ नसलेल्या मुख्यमंत्र्यांना ऑनलाइन लोकार्पणासाठीही वेळ मिळू शकला नसल्याने आम्ही उड्डाणपुलाचे लोकार्पण भिवंडीकर जनतेसाठी केले असून सेना सरकार जाणून बुजून नागरिकांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी महेश चौघुले यांनी केला आहे.

हा उड्डाणपूल सुरुवातीपासूनच श्रेयवादाने वादग्रस्त ठरला आहे. सुरुवातीला भूमिपूजन सोहळ्यावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. 2019मधील विधानसभा निवडणुकीनंतर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यासाठी खटाटोप सुरू करताच त्याची कुणकुण लागताच शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर आज भाजपाने या उड्डाणपुलाचे लोकार्पण करून या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.

परंतु, त्यामधील सुरू असलेल्या कामांना शिवसेना सरकार स्थगिती देऊन भिवंडीकर नागरिकांवर अन्याय करत केला आहे. या उड्डाणपुलाचे खरे श्रेय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याने या उड्डाणपुलाचे लोकार्पण भाजपाने केले, अशी प्रतिक्रिया भाजपा शहर अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.