ठाणे : ठाणे शहराच्या ( Thane City ) वेशीवर ठाणे शहरातील डम्पिंग ग्राउंड ( Dumping Ground in Thane ) आढळून येते. याच डम्पिंग ग्राउंडवर काही प्रमाणात लोकवस्तीदेखील आहे. परंतु, ही लोकवस्ती त्या नागरिकांची आहे. जे या डम्पिंग ग्राउंडमधून कचरा वेचत असतात. व त्यातूनच आपले रोजगारदेखील भागवत असतात. परंतु, तुटपुंज्या मिळणाऱ्या पैशांवर सगळ्याच गरजा भागत नाहीत. यामुळे येथील वस्ती व वस्तीतील नागरिक मुख्य प्रवाहापासून वेगळे असल्याचे पाहायला ( Deprived of Mainstreaming ) मिळते. परंतु, या समाजाला व या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शिक्षणामार्फतच होऊ शकते, हे जाणून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेकडून ( Jijau Educational and Social Institution ) येथे राहणाऱ्या लहान मुलांना शिक्षण दिले जाते.
दारिद्र्य रेषेतील लहान मुलांना शिक्षण देण्याचे कार्य केले : डम्पिंग ग्राउंड येथील लोकवस्तीत राहणाऱ्या लहान मुलांना खेळणे, बागडणे त्यासोबतच शिक्षण किती गरजेचे आहे. याचे महत्त्व पटवून देत जिजाऊ सामाजिक संस्थेने गेले वर्षभर येथील लहान मुलांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू केलेले आहे. हे शिक्षण देताना या लहान मुलांच्या कुटुंबातील परिस्थिती त्यांचे वैयक्तिक प्रश्न हेदेखील संस्थेकडून सोडवले जातात. नुकत्याच दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अॅडमिशनदेखील घेऊन देण्यात आले आहे. शिक्षणाचा अधिकार समाजातील प्रत्येक व्यक्तीला व प्रत्येक नागरिकाला व्हावा यासाठी हा उपक्रम राबवत आहेत, असे यावेळी संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे बोलत होते. या उपक्रमांंतर्गत फक्त शिक्षण देणे हाच उद्देश नसून, मुलांचा सर्वांगीण विकास करणे असल्याचा नीलेश सांबरे यांनी सांगितले.
जिजाऊंचे सामाजिक कार्य : कोरोना काळानंतर मुलांचे शिक्षण पूर्णपणे ठप्प झाले होते. परंतु, जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांसाठी शाळा सुरू करून मुलांच्या भविष्यासाठी योग्य पावले उचलले असल्याचे पालकांनी सांगितले. रोजगारासाठी आम्ही कचऱ्याच्या ढिगाऱ्यात कचरा वेचत असतो. परंतु, मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना शिक्षण मिळणे खूप गरजेचे आहे. मुलांनी चांगले शिक्षण घेतले, तर भविष्यात त्यांची चांगली प्रगती होऊन परिस्थिती सुधारू शकते. यामुळे जिजाऊ संस्थेचे पालकांनी व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले आहे.
मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न : समाजातील अशा संघटनांमुळे मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेमुळे घडले जाते. भविष्यात अशाच विद्यार्थ्यांनी आपला समाज घडणार असून, विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या अभूतपूर्व मदत मोलाची ठरत आहे.