ठाणे - मंगळवारी जाहीर झालेल्या १२ वी च्या निकालात ठाणे जिल्ह्यातील विदयार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९९.८७ टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचे ९९.७९, कला शाखेचे ९९.७९ तर वाणिज्य शाखेचे सर्वाधिक ९९.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत .
गेले वर्षभर कोरोनाकाळात बहुतांशी काळ ऑनलाईन क्लासेस द्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण झाले. सायन्स शाखेचे १४ हजार ३९७ विद्यार्थी तर १० हजार ८४९ विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील १४ हजार ३७३ विद्यार्थी आणि १० हजार ३२२ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत . याच प्रकारे कला शाखेचे ९९.७२ टक्के विद्यार्थी आणि ९९.८४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. याच प्रकारे वाणिज्य शाखेचे ९९.९२ टक्के विद्यार्थी , ९९.९७ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत तर व्यावसायिक शाखेचा निकाल ९९.८७ टक्के लागला आहे.
तालुकानिहाय गुणवत्ता यादी
कल्याण ग्रामीण ९९. ८२ टक्के, अंबरनाथ ९९.८९ टक्के, भिवंडी ग्रामीण ९९.७८ टक्के, मुरबाड ९९.६३ टक्के, शहापूर ९९.६३ टक्के, ठाणे पालिका परिसर ९९.९३ टक्के, नवी मुंबई पालिका परिसर ९९. ९० टक्के, मिराभाईंदर पालिका परिसर ९९.८५ टक्के, कल्याण डोंबिवली ९९. ८२ टक्के उल्हासनगर पालिका परिसर ९९. ९४ टक्के तर भिवंडी पालिका परिसराचा निकाल ९९.७२ टक्के लागला आहे.
हेही वाचा - राज्यपालांना अजूनही ते मुख्यमंत्री असल्याचा भास होतो; नवाब मलिकांचा खोचक टोला