ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून, आज पहाटेच्या सुमारास कपड्याच्या गोदामांना भीषण आग ( Khoka compound area cloth Warehouse caught fire ) लागल्याची घटना समोर आली आहे. खोका कंपाउंड भागातील कपडे व कपड्याच्या चिंध्याचा मोठ्या प्रमाणात साठा असलेल्या गोदामांना आग लागली.
हेही वाचा - Tribute To Lata Mangeshkar : 'या' शिल्प कलाकाराने दिली लतादीदींना अनोखी श्रद्धांजली
भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरातील कपडे व कपड्याच्या चिंध्या साठवण्याचे गोदाम आहेत. या गोदामाला अचानक पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्नी दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यत या आगीने तिन्ही गोदामांतील कपड्याच्या चिंध्या जळून मोठे नुकसान केले. तर, अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून दोन ते अडीच तासांत आग आटोक्यात आणली. मात्र, आग कशी लागली हे समजू शकले नसून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीच्या घटनेची नोंद भिवंडी शहर पोलीस ठाण्यात करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.