ETV Bharat / city

बेकायदा ४ मजली इमारत बांधकाम प्रकरणी जागामालकासह कुटुंबावर गुन्हा दाखल - भिंवडीत बेकायदा बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हा न्यूज

नवीन कणेरी येथील गैबीनगर परिसरात मुर्तुजा मोमीन यांची जागा आहे. त्या जागेवर त्यांनी चार मजल्याचे नवीन बांधकाम मागील वर्षीच्या जून महिन्यात केले आहे. हे बांधकाम करताना त्यांनी पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. यामुळे पालिका प्रशासनाने जागामालकासह कुटुंबावर शांतीनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

illegal construction in bhiwandi Registered FIR
बेकायदा ४ मजली इमारत बांधकाम प्रकरणी जागामालकासह कुटुंबावर गुन्हा दाखल
author img

By

Published : Dec 28, 2020, 4:58 PM IST

ठाणे - नवीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी भिवंडी निजामपूर महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदा चार मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी पालिका प्रशासनाने जागामालकासह कुटुंबावर शांतीनगर पोलीस ठाण्यात एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. मुर्तुजा गुलाम मोहम्मद मोमीन (जागामालक), रेहाना गुलाम मोमीन, जैद इक्बाल मोमीन आणि इक्बाल गुलाम मुस्तफा मोमीन (सर्व रा. नवीन कणेरी, भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

जून महिन्यात उभी केली होती बेकायदा इमारत
नवीन कणेरी येथील गैबीनगर परिसरात मुर्तुजा मोमीन यांची जागा आहे. त्या जागेवर त्यांनी चार मजल्याचे नवीन बांधकाम मागील वर्षीच्या जून महिन्यात केले आहे. हे बांधकाम करताना त्यांनी पालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे प्रभाग अधिकारी सोमनाथ सोष्टे यांनी जागामालक मुर्तुजा मोमीनसह त्यांच्या कुटुंबातील ३ जणांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९५२ चे कलम ५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

लॉकडाऊन काळात शहरात अनधिकृत बांधकामे पेव ?
लॉकडाऊन काळात सर्वच शासकीय यंत्रणा कोरोनामुळे व्यस्त होत्या. याचाच फायदा शहरातील भू-माफियांनी उचलून शेकडो अनधिकृत बांधकामे उभी केल्याचे सांगण्यात आले आहे. आता महापालिका क्षेत्र कोरोना मुक्तीच्या मार्गावर असल्याने पालिका प्रशासनाने अशा अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन त्यावर कारवाई करावी, अशी मागणी शहरातील दक्ष नागरिकांमधून होत आहे.

हेही वाचा - भिवंडीत गोदामाला लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

हेही वाचा - ठाण्यात मोबाईल चोरी प्रकरणी 2 जणांना अटक; गुन्हे शाखा व नवघर पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.