ETV Bharat / city

पत्नीची हत्या करून पतीनेच केला पोलीस ठाण्यात फोन

सततच्या भांडणाला कंटाळलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीची ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी आरोपीला अटक केली.

अंबरनाथ येथे पतीने केली पत्नीची हत्या
author img

By

Published : Jul 11, 2019, 10:50 PM IST

ठाणे - अंबरनाथ पूर्व येथे पतीने सततच्या भांडणाला कंटाळून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. आरोपीने पोलीसांना फोन केल्यानंतर पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पतीला अटक केले. दिपक भोई (वय 41) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अंबरनाथ येथे पतीने केली पत्नीची हत्या

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक यास एक मुलगा व मुलगी असुन तो पत्नी रूपाली (वय 39) व मुलांसोबत अंबरनाथ पूर्वेकडील रिलायन्स रेसिडेन्सीमध्ये राहत होता. दोघा पती-पत्नींमध्ये घरातील किरकोळ कारणावरून सतत वाद होत होते. सततच्या होणाऱ्या या भांडणाला दिपक खूपच वैतागला होता. अशातच बुधवारी दुपारी या दोघांमध्ये पून्हा भांडण झाले. वैतागलेल्या दिपकने भांडणादरम्यान ओढणीच्या साह्याने रूपालीचा गळा आवळून तिला ठार मारले. त्यानंतर त्याने स्वतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अंमलदार एपीआय बागल यांना फोन केला. मी माझ्या पत्नीची राहत्या घरी हत्या केली आहे, पोलिसांना त्वरीत पाठवा, अशी माहिती दिली. यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर रूपालीचा मृतदेह शवविच्छेदनसाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पती दीपक याला पोलिसांनी घटनास्थळावरच ताब्यात घेतले आहे. आरोपी दीपक भाई याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजितसिंग बग्गा करत आहेत

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:पत्नीची हत्या करून पोलीस ठाण्यात केला फोन ; पती गजाआड

ठाणे :- सततच्या भांडणाला कंटाळून संतापलेल्या पतीने पत्नीची फोडणीच्या सहाय्याने गळा आवळून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे , ही घटना अंबरनाथ पूर्व येथील पालेगाव रिलायन्स रेसिडेन्सीमध्ये घडली आहे,

खळबळजनक बाब म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात फोनवरून हत्या केल्याची माहितीही दिली, त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला गजाआड केले आहे, दिपक भोई वय 41 असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे, तर रूपाली वय 39 असे हत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे,

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दीपक हा मृतक पत्नी रूपाली, एक मुलगी एक मुला सोबत अबरनाथ पूर्वेकडील रिलायन्स रेसिडेन्सीमध्ये राहत आहे, या दोघा पती-पत्नीमध्ये घरातील किरकोळ कारणावरून सतत भांडणं होत होती , सतत होणाऱ्या भांडणाला कंटाळून आरोपी दीपक खूपच वैतागला होता अशातच बुधवारी दुपारी च्या सुमाराला पुन्हा या दोघांमध्ये भांडण झाले , त्या भांडणा दरम्यान दीपक याने ओढणीच्या साह्याने रूपालीचा गळा आवळून ठार मारले, त्यानंतर आरोपी दीपक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार एपीआय बागल यांना फोन करून मी माझ्या पत्नीचे राहत्या घरी हत्या केली आहे पोलिसांना त्वरीत पाठवा अशी माहिती दिली, पोलिसांना या घटनेची माहिती देताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत रूपाली चा मृतदेह शवविच्छेदन साठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला, तर रुपालीची हत्या करणारा तिचा पती दीपक याला पोलिसांनी घटनास्थळावर ताब्यात घेऊन अटक केली,
या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक राकेश डांगे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपी दीपक भाई याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजितसिंग बग्गा करीत आहेत,

सर, ftp मध्ये आज काही तांत्रिक अडचण आल्याने पोलीस बाईट, आणि आरोपी व्हिजवल मेलवर पाठवले आहे, mardar

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.