ETV Bharat / city

मुस्लीम वस्त्यातील बंद शाळांमुळे ३८ टक्के मुले बालमजूर - हुसेन दलवाई

बहुतांश ऊर्दू शाळा राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे बंद अवस्थेत असल्याचा आरोप खासदार दलवाई यांनी केला.

हुसेन दलवाई
author img

By

Published : Apr 20, 2019, 12:55 PM IST

ठाणे - मुस्लीम वस्त्यांतील शाळा बंद झाल्यामुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. अशी ३८ टक्के मुले बालमजुरीकडे वळाल्याचा दावा काँग्रेसचे प्रवक्ते, खासदार हुसेन दलवाई यांनी केला. ते भिवंडीमधील पत्रकार परिषदेत बोलत होते.

हुसेन दलवाई हे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी भिवंडीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भिवंडीतील मुस्लीम बांधवाच्या शैक्षणिक प्रश्नांवर प्रकाश टाकला.

भिवंडी शहरात साडेचार ते पाच लाखांच्या जवळपास मुस्लीम धर्मियांची संख्या आहे. तर भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात सुमारे ५० च्या आसपास ऊर्दू प्राथमिक शाळा आहेत. यापैकी बहुतांश ऊर्दू शाळा राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे बंद अवस्थेत असल्याचा आरोप खासदार दलवाई यांनी केला.

हुसेन दलवाई

विधानपरिषद व राज्यसभेत उर्दू शाळा बंद का हा अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला. मात्र, आजही भिवंडीतील गरीब मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, ज्या वयात शिक्षणाची , खेळण्याची, बागडण्याची आणि पुस्तक वाचण्याची इच्छा मुलांना असते. या वयात बालमजूर मुलांना राबविले जात असल्याने हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. आमचे सरकार आल्यास बंद अवस्थेतील शाळा पुन्हा खुल्या करून शिक्षणाचे दारे उघडे करून देऊ, असे त्यांनी आश्वासने दिले. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनाही आमच्या सरकारच्या काळात सुगीचे दिवस येतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Intro:किट नंबर 319

Body:मुस्लिम वस्त्यातील शाळा बंदमुळे 38 टक्के मुलं बालमजुरीत, कॉग्रेस प्रवक्त्याचे खळबळजनक वक्तव्य

ठाणे :- मुस्लिम वस्त्या तील शाळा बंदमुळे मुस्लिम समाजातील मुलं शिक्षणापासून वंचित राहून बालमजुरी कडे वळल्याचे खळबळजनक वक्तव्य कॉग्रेस प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई यांनी केले आहे, ते भिवंडी लोकसभा मतदारसंघातिला कॉग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन 38 टक्के मुस्लिम समाजातील गरीब मुलं बालमजूर म्हणून राबवली जात असल्याने हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी युती वर केली आहे,

भिवंडी शहरात साडेचार ते पाच लाखांच्या जवळपास मुस्लीम धर्मियांची संख्या आहे, तर भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रात सुमारे 50 च्या आसपास ऊर्दू प्राथमिक शाळा आहेत, यापैकी बहुतांश ऊर्दू शाळा राज्य सरकारच्या हलगर्जीपणा मूळे बंद अवस्थेत असल्याचा आरोप खासदार दलवाई यांनी सांगत विधानपरिषद व राज्यसभेत मी स्वतः उर्दू शाळा बंद का ? अनेक वेळा मुद्दा उपस्थित केला, मात्र आजही भिवंडीतील गरीब मुस्लिम विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ही त्यांनी केला,
ते पुढे म्हणाले की, ज्या वयात शिक्षणाचा , खेळण्याचा, बगळण्याची , पुस्तक वाचण्याची इच्छा असुनही ती मुलं बालमजूर म्हणून राबवली जात असल्याने हे सरकारचे अपयश असल्याची टीका त्यांनी केली, तसेच आमचे सरकार आल्यास ज्या बंद अवस्थेतील शाळा आहेत, त्या पुन्हा खुल्या करून शिक्षणाचे दारे उघडी करून देणार आहोत, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनाही आमच्या सरकारच्या काळात सुगीचे दिवस येतील असेही मत त्यांनी व्यक्त केले,

Conclusion:हुसेन दलवाई, पत्रकार परिषद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.