ठाणे - कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता, राज्यभर पुन्हा आरोग्यविभाग सतर्क झाला आहे. दुसरीकडे राज्य सरकारचे सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना तोडांला माक्ससह सोशल डिस्टिंग ठेवणे बंधनकारक असल्याचे पूर्वीसारखे कोरोनानियम आजही लागू आहेत. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या केवळ भेटीसाठी हजारो राष्ट्रवादी कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे डिस्टन्सचे नियम पाळले गेले नसल्याचे समोर आले आहे.
महापालिका आयुक्तांसोबत चर्चा
गृहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड भिवंडी महापालिका आयुक्तांसोबत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी दुपारच्या सुमाराला पालिका मुख्यालयात आले होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. अनेक कार्यकत्यांनी मास्कही लावला नव्हता. याविषयी आव्हाड यांना विचारले असता, पत्रकार तरी कोठे सोशल डिस्टन्सिंग पाळतात, असा सवाल केला. तसेच 20 जणांना एक आणि 200 जणांना एक असा नियम होऊ शकत नाही. सर्वांसाठी नियम सारखेच असल्याचे ते यावेळी म्हणाले.