ETV Bharat / city

...तर पाचव्या अन् सहाव्या रेल्वे रुळांचे काम थांबवू - गृहनिर्माण मंत्री आव्हाड - Reti Bunder

रेतीबंदर येथील पादचारी पुलाच्या बाबतीत रेल्वेकडून जी भूमिका घेतली जात आहे, ती बेजबाबदारपणाची आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच 50 जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्वरीत रेतीबंदर येथे पादचारी पुलाचे काम सुरू केले नाही तर पाचव्या-सहाव्या मार्गाचे कामच होऊ देणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

गृहनिर्माण मंत्री आव्हाड
गृहनिर्माण मंत्री आव्हाड
author img

By

Published : Oct 27, 2021, 4:53 PM IST

ठाणे - रेतीबंदर येथील पादचारी पुलाच्या बाबतीत रेल्वेकडून जी भूमिका घेतली जात आहे, ती बेजबाबदारपणाची आहे. रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळेच 50 जणांचे जीव गेले आहेत. त्यामुळे त्वरीत रेतीबंदर येथे पादचारी पुलाचे काम सुरू केले नाही तर पाचव्या-सहाव्या मार्गाचे कामच होऊ देणार नाही, असा इशारा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

बोलताना मंत्री आव्हाड

...नाहीतर रेल्वे बंद करू

पादचारी पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर पाच वर्षे उलटली आहेत. मात्र, अद्यापही पादचारी पुलाचे काम सुरू होत नाही. त्यामुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचे प्राण जात आहेत. त्या विरोधात डॉ. आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रेतीबंदर येथे मागील पाच वर्षांत 50 जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला आहे. रेल्वेने पादचारी पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले होते. त्यानंतर लगेचच या पुलाचे काम थांबविण्यात आले होते. त्यामुळेच गेल्या पाच वर्षात जे 50 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याची जबाबदारी मध्य रेल्वेला घ्यावीच लागेल. पादचारी पुलाचे कामही लवकर सुरू करा, नाहीतर रेल्वे बंद करू, असा इशारा मंत्री आव्हाड यांनी दिला आहे.

पाच वर्षांपासून चर्चाच सुरू आहेत का..?

रेल्वेने पादचारी पुलाच्या जागेत बदल केल्याचा खुलासा केला आहे. याबाबत विचारले असता, रेल्वेकडून खोटे बोलले जात आहे. अशा पद्धतीचा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळेच आपण पुन्हा एकदा ठामपणे म्हणत आहोत की रेतीबंदर परिसरात जे 50 लोक अपघातात मृत्यमुखी पडले आहेत. त्यास मध्य रेल्वे आणि एमआरव्हीसीच जबाबदार आहे. ठाणे महापालिकेशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. गेले पाच वर्ष चर्चाच सुरू आहे का, असा सवालही डॉ. आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

रेल्वेचे अधिकरी खोटारडे

आतापर्यंत या कामाच्या दरम्यान जवळपास 50 मृत्यू झालेले आहेत. हे सर्व मृत्यू रेल्वेच्या गलथान कारभारामुळे झाले आहे. मात्र, रेल्वेने यापूर्वी ट्विटरवर अशा प्रकारच्या अपघात न झाल्याची माहिती दिलेली आहे. ही माहिती खोटी असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा - शाळे समोरच मुलांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, तिघे अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.