ठाणे : आज रेल्वेच्या 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेच्या उदघाटनानिमित्त ठाण्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह इतर मंत्री आणि भाजपचे नेते आले होते. त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाहेर वडा पावच्या दुकानात नाश्ता केला होता. या नाश्त्याचे बिल न भरताचं ते निघून गेले ( Raosaheb Danve Left Hotel Without Paying Bill In Thane ) होते. दोन हजार रुपयांचे हे बिल न भरल्याबाबत ईटीव्ही भारतने बातमी प्रकाशित करताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये येत बिल भरले ( Hotel Bill Paid By BJP Worker In Thane ) आहे.
हेही वाचा : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी भजे, वडापाववर मारला ताव, हॉटेलचे बिल न देताच गेले परत
मोदींच्या राज्यात कॅशमध्ये व्यवहार
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळ्या पैशाबाबत आग्रही असताना त्यांच्या कार्यकर्त्यांनी रोखीने पैसे भरल्याचे बिल भरले आहे. यात जीएसटीचा अंतर्भाव नाही. त्यामुळे भाजप नेत्यांच्या या वर्तनामुळे पुन्हा भाजपचे हे बिल चर्चेचा विषय झाले आहे.
कार्यकर्ते भेटले दुकानदाराला
ईटीव्ही भारताच्या बातमीनंतर भाजप कार्यकर्ते मालकाला भेटले आणि बिल अदा केले. 'बिल मिळाले असून, मंत्र्यांनी माझ्या दुकानाला पाय लावले याबाबत धन्यवाद' असे सांगत गैरसमजूत न करण्याचे मालकाने केले.
शेकडो वडापाव आणि अनेक प्लेट भज्यांवर मारला ताव
ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेल्या गजानन या प्रसिद्ध वडा पाव विक्रेत्याच्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव ( Railway Minister Ashwini Vaishnaw ) यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील ( Minister Kapil Patil ) , खासदार विनय सहस्त्रबुद्धे ( MP Vinay Sahasrabudhe ) , भाजप आमदार संजय केळकर ( MLA Sanjay Kelkar ) , आमदार निरंजन डावखरे ( MLA Niranjan Dawkhare ) यांनी ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा रेल्वे प्रवास केला. त्यानंतर ठाणे स्थानकाच्या बाहेर भूक लागल्यावर वडा पाव वर ताव मारला. मात्र शेकडो वडापाव आणि अनेक भजी प्लेट खाल्यानंतर ते आणि त्यांचे कार्यकर्ते बिल न देताच निघून गेले होते.