ETV Bharat / city

संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर सुप्रीम कंपनीकडून महामार्ग दुरुस्तीस सुरुवात

author img

By

Published : Nov 29, 2019, 6:08 PM IST

भिंवडीतील अंजूरफाटा - चिंचोटी मार्गाची रेकॉर्डब्रेक पावसामुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर सुप्रीम कंपनीकडून देखभाल दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

Highway repairs started by Supreme Company
सुप्रीम कंपनीकडून महामार्ग दुरुस्तीस सुरुवात

ठाणे - भिवंडीतील अंजूरफाटा - चिंचोटी रस्त्याची देखभाल दुरुस्ती व टोल वसुलीचे काम मे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले आहे. मात्र, यावर्षी रेकॉर्डब्रेक पडलेल्या पावसामुळे या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांनी एकत्रित येऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे. या संघर्ष समितीच्यावतीने रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनासह टोल कंपनीचे लक्ष वेधावे म्हणून संघर्ष समितीच्यावतीने शनिवारी ३० नोव्हेंबरला खारबाव येथे रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. या रास्ता रोको आंदोलनाची दखल सुप्रीम कंपनीने घेतली असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंजूरफाटा - चिंचोटी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे.

भिवंडी तालुक्यातील चिंचोटी - कामण - अंजूरफाटा ते माणकोली या १४ किमी. लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. रोजच्या वाहन अपघातांमुळे नागरिकांचे हकनाक बळी जाऊन प्रवासी जखमी होण्याच्या घटना रोजच घडू लागल्याने या रस्त्याच्या अखत्यारीतील अनेक गावांच्या नागरिकांनी ३१ ऑगष्टला खारबाव नाका येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून टोल वसुली बंद पाडली होती. त्यामुळे या आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व मे.सुप्रीम वसई भिवंडी टोल वेज प्रा.लि.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे.

डिसेंबर अखेर रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता सचिन धात्रक यांनी टोल कंपनीला दिले आहेत. त्यानुसार मे.सुप्रीम कंपनीने पुन्हा या महामार्गावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून संघर्ष समितीने ३० नोव्हेंबरला पुन्हा खारबाव नाका येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असल्याने, या रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्याने सतर्क झालेल्या सुप्रीम कंपनीने अंजूरफाटा - चिंचोटी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. रस्ता दुरुस्तीमुळे नागरिकांसह चालकांना दिलासा मिळाला आहे.

Intro:kit 319Body: संघर्ष समितीच्या इशाऱ्यानंतर सुप्रीम कंपनीकडून महामार्ग दुरुस्तीस सुरुवात

ठाणे : भिवंडीतील अंजूरफाटा - चिंचोटी रस्त्याची देखभाल दुरुस्ती व टोल वसुलीचे काम मे.सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले आहे. मात्र यावर्षी रेकॉर्डब्रेक पडलेल्या पावसामुळे या महामार्गाची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांनी एकत्रीत येऊन संघर्ष समिती स्थापन केली आहे. या संघर्ष समितीच्यावतीने रस्त्याच्या दुरावस्थेकडे शासनासह टोल कंपनीचे लक्ष वेधावे म्हणून संघर्ष समितीच्यावतीने शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी खारबाव येथे रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. या रास्तारोको आंदोलनाची दखल सुप्रीम कंपनीने घेतली असून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंजूरफाटा - चिंचोटी या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे.

भिवंडी तालुक्यातील चिंचोटी - कामण - अंजूरफाटा ते माणकोली या १४ किमी.लांबीच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने वाहन चालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत.रोजच्या वाहन अपघातांमुळे नागरिकांचे हकनाक बळी जाऊन प्रवासी जखमी होण्याच्या घटना रोजच घडू लागल्याने या रस्त्याच्या अखत्यारीतील अनेक गावांच्या नागरिकांनी ३१ ऑगष्ट रोजी खारबांव नाका येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून टोल वसुली बंद पाडली होती.त्यामुळे या आंदोलनाने खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व मे.सुप्रीम वसई भिवंडी टोल वेज प्रा.लि.कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेतले आहे.
डिसेंबर अखेर रस्त्याच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण करावे असे निर्देश सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता सचिन धात्रक यांनी टोल कंपनीला दिले आहेत.त्यानुसार मे.सुप्रीम कंपनीने पुन्हा या महामार्गावर दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून संघर्ष समितीने ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा खारबाव नाका येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असल्याने या रास्ता रोको आंदोलनाच्या इशाऱ्याने सतर्क झालेल्या सुप्रीम कंपनीने अंजूरफाटा - चिंचोटी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून रस्ता दुरुस्तीमुळे नागरिकांसह चालकांना दिलासा मिळाला आहे.

Conclusion:mahamarag
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.